Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»अजिंठा शासकीय विश्रामगृहात रगेंल लीला, मागासवर्गीय मुलीवर लैंगिक अत्याचार?
    यावल

    अजिंठा शासकीय विश्रामगृहात रगेंल लीला, मागासवर्गीय मुलीवर लैंगिक अत्याचार?

    saimat teamBy saimat teamNovember 9, 2021No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    भुसावळात आढळला एक नवीन रुग्ण; संख्या चारवरून पाचवर
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल, प्रतिनिधी । जळगाव येथील उच्चभ्रू वस्तीत असलेल्या अजिंठा शासकीय विश्रामगृहात रगेंल लीला आणि मागासवर्गीय मुलीवर लैंगिक अत्याचार ? झाल्याची घटना चर्चिली जात असल्याने या घटनेची चौकशी करून जो कोणी असेल त्याला कायद्याच्या चौकटीत आणून कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी जनसामान्यांची मागणी असल्याचे निवेदन जळगाव जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्षा सौ वंदना अशोक चौधरी यांनी जिल्हाधिकारी जळगाव पोलीस अधीक्षक जळगाव यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. जळगाव शहरात पुन्हा 1994 मधील वासना कांदाच्या घटनेला उजाळा मिळत आहे का यासंदर्भात संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील राजकारणात समाजात चर्चेला उधाण आले आहे.

    जिल्हाधिकारी जळगाव, पोलीस अधीक्षक जळगाव यांना दिलेल्या निवेदनात जळगाव जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी अध्यक्ष सौ वंदना अशोक चौधरी तसेच महानगर अध्यक्ष अशोक एस लाडवंजारी यांनी म्हटले आहे की जळगाव येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात एका मागासवर्गीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला असल्याची बातमी समाज माध्यमांवर फिरत आहे ही अतिशय लज्जास्पद घटना आणि बाब आहे सदर मुलीची प्रकृती अस्वस्थ असल्याचे समजते हे ज्यांनी कोणी केले असेल त्याला कायद्याच्या चौकटीत आणून कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी जनसामान्यांची मागणी आहे.

    हा जो प्रकार अजिंठा शासकीय विश्रामगृहात झाला त्यावेळेस सदरची रुम कोणाच्या नावावर होती.तेथील सीसीटीव्ही फुटेज तेथे वास्तव्यास असलेले कर्मचारी यांची सक्तीने सखोल विचारपूस करून खरे गुन्हेगार शोधून काढावेत गुन्हा करणारे एका राजकीय पक्षाचे उच्चपदस्थ असल्याने गुन्हा करणारे सदर प्रकरण दडपून टाकण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत तरी सदर प्रकरणी आपण योग्य ती दखल घेऊन गुन्ह्याचा शोध तात्काळ लावण्यात यावा व त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी विनंती वजा मागणी करण्यात आली आहे.

    याबाबत जळगाव शहरात सर्वत्र ठिकाणी चर्चा आहे की शहरातील एका शासकीय विश्रामगृहात ऐन दिवाळीत एकाच राजकीय पक्षातील दोन नेत्यांनी एका मायक्रो ओबीसी समाजाच्या मुलीवर अत्याचार केल्याने त्यामुळे पीडित मुलीचे ब्लडिंग होऊन प्रकृती खालावल्याने त्या पीडितेला शहरातल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते घटनेनंतर तक्रार करण्याच्या तयारीत असलेल्या पिडीतेच्या मामाला दोघं लोकप्रतिनिधींनी विश्वासात घेऊन काहीतरी आमिष आश्वासन देत शहरातून गायब केल्याची, अज्ञातस्थळी रवाना केल्याची जोरदार चर्चा आहे,उपचाराच्या नावाखाली पीडितेला शहरात तिच्यावर प्राथमिक उपचार झाल्यानंतर जळगाव येथून औरंगाबाद व आता पुण्यात हलविण्यात आल्याची सुद्धा चर्चा आहे. तसेच आता सकाळपासून सुरु असलेल्या चर्चा आणि अफवेनुसार पीडित तरुणीची प्रकृती अति गंभीर झाली असल्याने तिला मुंबईला हलवण्यात आल्याचे समजले.

    एका मागासवर्गीय मुलीवर अत्याचार करणाऱ्यांमध्ये दोन बडे राजकीय नेते सहभागी असल्याचे सुद्धा बोलले जात आहे यात जळगावातील बड्या नेत्याचा मुलगा सहभागी असल्याची सुद्धा चर्चा होती,एवढेच नव्हे तर काही जणांनी या घटनेचे थेट चाळीसगाव कनेक्शन देखील जोडण्याचा प्रयत्न केला असून याबाबत अधिकृत कुठलीही माहिती अद्यापही समोर आलेली नाही.

    या घटनेबाबत जळगावातील एका बड्या नेत्याने आज नाशिक पोलीस महानिरीक्षक खान यांच्यासोबत या कथित घटनेबाबत चर्चा केली असल्याचे कळते एवढेच नव्हे तर पोलिस विभागाचे आयजीचे एक विशेष पथक जळगावात या घटनेची सत्यता तपासणी करीत असल्याचे देखील जळगावात बोलले जात आहे परंतु अद्याप पर्यंत ह्या घटनेच्या सत्यतेबाबत कुठूनही ठोस माहिती मिळू शकलेली नाही परंतु चर्चा जोरात सुरू आहे.याबाबत मात्र नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना तपासाच्या सूचना दिल्या असल्याचे समजते त्या विश्रामगृहाच्या बुकींग कर्मचारी व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे प्राथमिक चौकशी सुरू झाल्याचे सुद्धा कळते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Yaval : पाच महिलांच्या मंगळसूत्रांवर चोरट्याचा डल्ला अट्रावल यात्रेत गर्दीचा गैरफायदा

    February 1, 2026

    yaval : भुसावळ–यावल रस्त्यावर घडलेल्या एका धक्कादायक बसमध्ये सोन्याची पोत चोरी

    January 23, 2026

    “सत्तासंघर्ष थांबला! यावल नगरपरिषद समिती सभापती निवडीत ऐतिहासिक समझोता”

    January 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.