अखिल महाराष्ट्र भोई समाज सेनेची ऑनलाईन बैठक उत्साहात

0
10

भुसावळ : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने एप्रिल महिन्यात लॉक डाऊन ची घोषणा केल्यामुळे संघटनेची बैठका होऊ शकली नव्हती, त्यामुळे शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करत भोई समाज सेनेची ऑनलाइन बैठकीचे आयोजन करण्यात आले . सदर ऑनलाइन बैठक नुकतीच नितीन भोई यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली .
सदर बैठक नियोजना नुसार झूम ऍप च्या साहाय्याने घेण्यात आली . बैठकीत सामाजिक विषयावर ऑनलाइनच्या माध्यमातून समाजहिताचे तसेच शासनाच्या धोरणांच्या पार्श्‍वभूमीवर जास्तीत जास्त जनतेची हिताची असल्याचे कामे समाजाच्या माध्यमातून कसे करण्यात येईल याचे मंथन करण्यात आले. यासाठी सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचेही ऑनलाइन बैठकीत निष्पन्न झाले. यावेळी शासनाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर घेतलेल्या निर्णयात एक मे पासून अठरा १ते४५ वयोगटातीलसर्वांना लसीकरण करण्यात येणार असल्यामुळे समाजातील प्रत्येकाने यासाठी पुढाकार घ्यावा असे आव्हान विजय इंगळे व निलेश नेमाडे यांनी ऑनलाइन बैठकीत केले.
बैठकीत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र तमखाने, प्रदेशाध्यक्ष नितीन भोई, राज्य संपर्क प्रमुख प्रविण भोई , राज्यमहासंघटक निलेश नेमाडे, उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख विजय रघुनाथ इंगळे , औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष विजय खेडकर , सागर भोई, विनोद भोई , शिल्पा रुयारकर , भारती भोई , सुवर्णा साठे तसेच अखिल महाराष्ट्र भोई समाज सेनेचे विविध पदाधिकारी सदस्य यांनी सहभाग घेत आपली मते मांडली. बैठकीत संघटनेचा प्रचार व प्रसार करणे व समाजातील समस्या व उपाय योजना या विषयावर चर्चा झाली. समाजाला नवी दिशा मिळाली पाहिजे, विविध प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे ठरले. चर्चेत महिलांना समान संधी मिळाली पाहिजे या विचाराने नितीन भोई यांनी ४ मे रोजी विद्यार्थी सेना व महिला सेना आघाडी स्थापन करण्याची घोषणा करून बैठकीचा समारोप करण्यात आला. बैठकीत विजय इंगळे साकेगाव, निलेश नेमाडे बुलढाणा, नितीन भोई पारोळा, प्रवीण भोई पिंपळगाव देवी, राजेंद्र तमखाने नागपूर, शिल्पा रुईकर वरोरा विदर्भ , भारती भोई पिंपळगाव देवी, सागर भोई उतरान , विनोद भाई वरणगाव, विजय खेडकर यांची उपस्थीती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here