अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची जळगाव विद्यापीठ कार्यकारिणी जाहीर

0
53

जळगाव, प्रतिनिधी । अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, “छात्र नेता” संमेलन कार्यक्रमात कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ. परिसराची कार्यकारणी घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून अभाविप महारष्ट्र प्रदेश सहमंत्री विराज भामरे उपस्थित होते.

कार्यकारणीची निर्वाचन अधिकारी म्हणून अभाविप जळगाव महानगर अध्यक्ष प्रा.डॉ.अमरदीप पाटील यांनी काम पाहिले. यावेळी मंचावर महानगर अध्यक्ष प्रा.डॉ.अमरदीप पाटील, महानगर मंत्री रितेश महाजन, कवयित्री बहिणाबाई नगर नगर मंत्री आकाश पाटील उपस्थित होते.

अभाविप प्रदेश सहमंत्री यांनी अभाविप मांडणी करत. अभाविपच्या व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा ज्वलंत इतिहास कार्यकर्त्यांसमोर मांडला. अभाविपच्या कामात सामूहिक तिचे महत्त्व पटवून दिले.तसेच परिषदेचे काम समजावून सांगितले. परिषदेमध्ये पद नसून प्रत्येक कार्यकर्त्याला जबाबदारी देत असतो. जबाबदारी घेऊन जिम्मेदार विद्यार्थी परिषदेमध्ये घडत असते. परिषद ही व्यक्ती निर्माणाचे काम करते असे सांगितले. आपण सर्वांना मिळालेली जबाबदारी योग्य न्याय द्यावा व राष्ट्र कार्यात सामील व्हावे असे ही त्यांनी सांगितले.

तसेच महानगर मंत्री रितेश महाजन यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. नवनिर्वाचित अध्यक्ष यांनी आपल्या मनोगतात मी नेहमीच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर त्वरित उत्तर शोधण्याचा प्रयत्न करेन. त्याचबरोबर संघटनात्मक कार्य वाढवण्यास प्रयत्न करेल असे मत विद्यापीठ अध्यक्ष हर्षल महाजन यांनी व्यक्त केले.

नूतन कार्यकारिणी विद्यापीठ परिसर अध्यक्ष हर्षल महाजन, विद्यापीठ परिसर उपाध्यक्ष म्हणून तनुश्री पवार, प्रशांत धनगर, आदित्य कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. याशिवाय ७० कार्यकर्त्यांना विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या. यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओमकार कदम यांनी केले. आणि आभार प्रदर्शन आकाश पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here