अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पुढाकाराने गुन्हा दाखल

0
24

चोपडा : प्रतिनिधी
तालुक्यातील चहार्डी येथील माहेर असलेली पिडीत महिला अर्चना अनिल बोडके या महिलेने न्यायालयात घटस्फोट घेऊन पुनर्विवाह केला. हि बाब नाथजोगी समाजातील जातपंचायतीस मान्य नसल्यामुळे काही दिवसापुर्वी वडगांव, पिंजर ता. बार्शीटाकळी जि. अकोला येथील नाथजोगी जातपंचांनी न्यायनिवाडा करतांना केळीच्या पानावर पंचांनी थुंकलेली थुंकी पिडीत महिलेने चाटायची तसेच पायावर नाक घासून तोंड काळे करायचे त्यानंतर सदर महिलेची मिरवणूक काढायची अशी शिक्षा सुनावली होती.तसेच एक लाख रुपये दंड वसूल करुन समाजातून बहिष्कृत केले. यामुळे पिडीत महिलेने अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या सहकार्याने चोपडा शहर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करुन गुन्हा नोंदविला.
सदर घडलेल्या प्रकाराविषयी पिडीत महिलेने अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या जळगाव व चोपडा शाखेशी संपर्क करुन संपुर्ण घटनाक्रम सांगितला.व त्यांच्या सहकार्याने जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक जळगांव तसेच चोपडा शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्याशी संपर्क करुन लेखी तक्रार दिली.पिडीत महिला व कुटूंबीयांना तसेच नातेवाईकांना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यासाठी आग्रही भुमिका घेतली. याकामी अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. दिगंबर कट्यारे, महिला असोसिएशन सदस्या वासंतीताई दिघे, चोपडा तालुका कार्याध्यक्ष डॉ. अय्युब पिंजारी, जळगावचे शिरीष चौधरी, डॉ. नरेंद्र शिरसाठ, पत्रकार आर. डी. पाटील, सचिन जैस्वाल व चोपडा शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी सहकार्य केले. अंनिसचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष अविनाशभाई पाटील तसेच जातपंचायत विभाग प्रमुख कृष्णा चांदगुळे यांच्या मार्गदर्शनाने सामाजिक बहिष्कार प्रतिबंध व निवारण अधिनियम २०१६, जातपंचायत विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
दि. १३ में २०२१ रोजी चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे पिडीत महिला अर्चना अनिल बोडके तसेच कल्पेश बाबर, सुदाम सिद्धू बाबर, लक्ष्मीबाई सुदाम बाबर, दिपाबाई काशीनाथ शिंदे आदिंनी नाथजोगी समाजातील पंच एकनाथ सावळा शिंदे, प्रेमनाथ धर्मा शिंदे, गणेश नागो बाबर, शिवनाथ एकनाथ शिंदे, किसन शंकर सावंत, दिनेश भगवान चव्हाण, काशिनाथ रघुनाथ बाबर, कैलास एकनाथ शिंदे, कैलास नानु सावंत, संतोष विश्‍वनाथ शेगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here