भुसावळ : प्रतिनिधी
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छ्त्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि विचार बालमनावर रुजावेत या उदात्त हेतूने अंतर्नाद प्रतिष्ठान भुसावळ आणि पंचायत समिती शिक्षण विभागा यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विध्यार्थ्यासाठी आणि खुल्या गटात इच्छुक व्यक्तीसाठी तालुकास्तरीय ऑनलाईन वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे चौथे वर्ष आहे.
सध्याचा कोऱोना काळ लक्षात घेता सदर स्पर्धा ही ऑनलाईन घेण्यात येत आहे. इच्छुक सहभागींनी आपला वकृत्वाचा व्हिडिओ तयार करून तो यु ट्युबला डाउनलोड करून त्याची लिंक अंतर्नाद प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या व्हाटस अप ला टाकावयाची आहे.प्राथमिक फेरी ऑनलाईन होणार आहे आणि अंतिम फेरी बक्षीस वितरणाच्या दिवशी होणार आहे.
वकृत्व स्पर्धा ४ गटात होणार आहे.प्रत्येक गटातील ३ विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, शिव चरित्र पुस्तक, प्रमाणपत्र देण्यात येइल.सहभागी सर्व स्पर्धकांना ई प्रमाणपत्र देउन प्रोत्साहन दिले जाणार आहे.
पहिला गट ३ री ते ५ वी साठी आहे.शिवराज्याभिषेक, जिजाऊंचा शिवबा, मी बाल शिवाजी बोलतोय असे विषय असतील.वेळ ३ मिनिट आहे.दुसरा गट ६ वी ते ८ वीचा आहे.शिवरायांची युद्धनीत, छत्रपती शिवाजी महाराज एक उत्तम प्रशासक, छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे गड किल्ले असे विषय असतील.वेळ ४ मिनिट आहे.
स्पर्धकांचा तिसरा गट ९ वी ते १२ वीचा आहे.महिलांचा आदर करणारे शिवराय, शिवरायांचे जलव्यवस्थापन, बहुजननायक छत्रपती शिवाजी असे विषय असतील.वेळ ५ मिनिट आहे.पहिल्यांदाच खुल्या गटासाठी तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धा होणार आहे.चौथा गट हा खुला असणार आहे.यात कुणीही भाग घेउ शकणार आहे.यात वयाची किवा व्यवसायाची कुठलीही अट नसणार आहे.शिवरायांचे धर्मनिरपेक्ष धोरण, छत्रपती शिवाजी महाराज एक मॅनेजमेंट गुरु, छत्रपती शिवाजी महाराज यांचे कृषी धोरण व आजचा शेतकरी असे विषय असतील.वेळ ७ मिनिट असणार आहे. याबाबत नुकतीच नियोजनाची बैठक घेण्यात आली. अंतर्नादचे आणि शिक्षण विभागाचे सदस्य बैठकीला उपस्थित होते.
नियोजन समितीत ज्ञानेश्वर घुले, प्रदीप सोनवणे, योगेश इंगळे, जीवन महाजन, सुनिल वानखेडे, श्रीकांत जोशी, नाना पाटील, आनंद सपकाळे,समाधान जाधव, अमित चौधरी, प्रा.पंकज पाटील, निवृत्ती पाटील, अमितकुमार पाटील, प्रा.श्याम दुसाने, वंदना भिरुड, प्रा.भाग्यश्री भंगाळे, भूषण झोपे ,रोहिदास सोनवणे, राजेंद्र जावळे, शैलेंद्र महाजन, विक्रांत चौधरी, जीवन सपकाळे, हरीश भट, सचिन पाटील, प्रमोद पाटील, संदिप सपकाळे, मंगेश भावे हे आहेत.जास्तीत जास्त विध्यार्थी आणि इतर इच्छुकानी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन प्रकल्प प्रमुख संजय भटकर, प्रकल्प समन्वयक देव सरकटे, सह समन्वयक राजू वारके, गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान, शिक्षण विस्तार अधिकारी किशोर वायकोळे, अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी केले आहे.