स्पर्धा परीक्षा यशासाठी समर्पणाची गरज,पाळधी येथे भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर संपन्न

0
30
पहुर ता.जामनेर प्रतिनिधी – 
कोरोनामुळे  उच्चशिक्षित बेरोजगार तरुण तरुणीच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या बेरोजगार तरुणाईला पोलीस व सैनिक होण्याची आजही तितकीच आशा आहे.स्पर्धेत कमी पडु नये,आज ना उद्या पोलीस भरती होईल या आशेने जिवतोड मेहनत करणाऱ्या तरूणांसाठी पाळधी येथील माजी सरपंच कमलाकर पाटील व माजी सभापती निता कमलाकर पाटील या दाम्पत्याने शिवजयंतीनिमित्त पोलीस तसेच सैन्यदलाच्या भरतीची तयारी करणाऱ्या तरुणासाठी स्पर्धेचे आयोजन केले होते यात लेखी परीक्षा व मैदानी शिबिरासाठी जवळपास ४५० तरूण तर ६० तरुणीनी सहभाग नोंदविला ग्रामीण भागातील शिबिरास तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला उच्चशिक्षित युवक सुद्धा इतर ठिकाणी नोकरी मिळत नसल्याने या क्षेत्राकडे वळत आहेत परंतु इथे सुद्धा सरकार नोकर भरती प्रक्रिया राबवत नसल्याने अनेक गोरगरीब तरुण बेरोजगार झालेले आहेत पूर्वी ग्रामीण भागातील मुली या क्षेत्रात येत नव्हत्या परतू आता त्याची संख्येत सुद्धा लक्षणीय वाढ झाल्याचे या शिबिरावरून लक्षात येते
या शिबीरांस लेखी व मैदानी स्पर्धेमध्ये प्रथम मयूर भारत पाटील ,व्दितीय राहुल संतोष काळे,तृतीय एकनाथ तिरमल, अजय पांढरे,मनोज पाटील, गौरव बारी तर मुली मध्ये प्रथम निकिता सुनील चौधरी, व्दितीय अंजुम तडवी,माया कोळी,रिता पवार, या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.
यावेळीस उपस्थित तरुणांना  पहुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांनी मार्गदर्शन करताना आपल्याला काय बनायचं आहे? ते आधी ठरवा.त्या अतुट ध्येयाप्रती निष्ठा ठेवा,समर्पणाच्या भावनेतून जिद्दीने प्रयत्न करा. यश तुमचेच आहे असा सल्ला दिला तसेच कमलाकर पाटील, चंद्रकांत बाविस्कर, दिलीप खोडपे,राजेंद्र चौधरी आदीनी मनोगत व्यक्त केले ,यावेळी सभापती जलाल तडवी,दिलीप खोडपे,चंद्रकांत बाविस्कर,दिपक तायडे,निता पाटील, राजेंद्र चौधरी,डिंगबर माळी,सोपान सोनवणे, मनोज नेवे ,संदिप सुशीर,देवचंद परदेशी, मनोज जंजाळ,अर्जुन अहिरे, आदी उपस्थित होते जामनेर नगराध्यक्षा साधना महाजन यांनी सुद्धा भेट देऊन तरुणाचा उत्साह वाढविला शिबीराच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत अमोल देशमुख,चेतन आहीरे, राजेश लाहसे,चंद्रकांत घोंगडे, भुषण सोनवणे, चंद्रकांत चिकटे,नितीन लावणे,शिवाजी वाघ,राहुल वानखेडे,अमोल क्षिरसागर,अरूण फरकाडे तसेच वीर भगतसिंग अभ्यासिकातील तरुणांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिल. डि.सोनवणे यांनी केले पोलिस व सैन्य भरतीसाठी आम्ही मैदानी चाचणीसह इतर अभ्यासक्रमाचा या शिबिरात अनुभव घेतला.पोलीस भरती आज ना उद्या होईल त्यात आपण कुठेही कमी पडू नये आणि चालुन आलेली पोलिस अधिकारी होण्याची तरुणांची संधी हुकणार नाही म्हणून कमलाकर पाटील यांनी आयोजित केलेल्या शिबिरातुन आम्हाला खुप काही शिकायला मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here