चाळीसगाव(प्रतिनिधी)- संपूर्ण भारतात लोककला शाहिरी क्षेत्रात “डि.लीट. पदवी (डॉक्टरेट) प्राप्त एकमेव शिवशाहिर, चित्रकार, शिल्पकार, सिनेमा व सिरियल कलाकार, लेखक, कवी, तसेच छत्रपती शिवाजीराजे अभ्यासक व्याख्याते आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व व बहुआयामी व्यक्तिमत्त्व व शतावधानी कलाकार शिवशाहीर डॉ राजुजी राऊत यांनी चाळीसगाव येथील ” सिंहगड” या निवासस्थानी व “भालेराव फर्निचर” शोरुम — येथे सदिच्छा दिली यावेळी शिवशाहीर शामराव खडके सर – शिक्षण क्षेत्रात राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शाहिर (कोल्हापूर) तसेच श्रीमती इंदुमती गोविंद भालेराव संजय गोविंद भालेराव नगरसेविका सविता राजपूत रंजना पाटील प्राध्यापक आर् एम पाटील तुषार महाजन पत्रकार आरडी चौधरी जिजाबराव वाघ कवी रमेश पोद्दार लालचंद बजाज अजय विसपुते वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होतेचाळीसगाव तालुक्यातील मान्यवर साहित्यिक, कवी, लेखक, पत्रकार, शिक्षक, प्राध्यापक, कलाकार, पोवाडा गायक, शाहिर इत्यादी उपस्थित होते.