जळगाव, प्रतिनिधी । शहरातील एक उच्चभ्रू वस्तीत असणाऱ्या कुंटणखाना एमआयडीसी पोलिसांनी 30 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास धाड टाकली आहे याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजिंठा चौकाजवळील एक भागात असणाऱ्या उच्चभ्रू वस्तीत भाड्याच्या घरात सुरू असलेल्या कुटंनखान्यावर एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने आज गुरुवारी 30 सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता छापा मारला. या ठिकाणाहुन एक महिला व दोन दलालांना ताब्यात घेण्यात आले. तीन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली. अमोन आदिनाथ दारकुंडे (वय २९, रा. क्रांतीचौक, शिवाजीनगर) व प्रशांत रतन जैन (वय ३१, रा. अयोध्यानगर, अजिंठा हौसिंग सोसायटी) असे अटक केलेल्या दलालांची नावे आहेत. त्यांच्यासह एका महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शहरातील अजिंठा चौफुलीजवळील एक भागात एकाच्या घरात महिला भाड्याने राहत होती. महिलेने या घरात कुटंनखाना सुरू केल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रमोद कठोरे, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, गफार तडवी, सुनिल सोनार, हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, नीलेश पाटील, महेश महाले, रवींद्र मोतीराया यांच्या पथकाने आज गुरुवारी 30 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास एक बनावट ग्राहकाच्या माध्यमातून कुंटनखान्यात प्रवेश केला.
यावेळी तेथे तीन पिडीत महिला मिळुन आल्या. त्यांची सुटका करण्यात आली. तर अमोन आदिनाथ दारकुंडे (वय २९, रा. क्रांतीचौक, शिवाजीनगर) व प्रशांत रतन जैन (वय ३१, रा. अयोध्यानगर, अजिंठा हौसिंग सोसायटी) यांच्यासह महिलेस ताब्यात घेऊन कारवाई केली. तीघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.