Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»विद्युत खांबावरून सात तासानंतर उतरवला युवकाचा मृतदेह
    क्राईम

    विद्युत खांबावरून सात तासानंतर उतरवला युवकाचा मृतदेह

    saimat teamBy saimat teamJanuary 15, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नंदुरबार । येथील तरुण शेतकरी पंकज दरबारसिंग गिरासे (वय 32) हा ट्रांसफार्मर बसण्याच्या ठिकाणी हजर असताना त्या तरुणास जाधव नामक वायरमनने 11 kv च्या एग्रीकल्चर लाईन फिडरच्या वरती झंपर जोडण्यासाठी खांबावरती चढण्यास विनंती केली.

    जाधव वायरमन यांनी सांगितले मी महावितरणच्या सबस्टेशनच्या ऑपरेटर कर्मचारी यांना फोन करून लाईट बंद करायला लावलेली आहे. तू बिनधास्त चढ काय घाबरू नको असं म्हणत पंकज याला मुख्य थ्री फेज खांबावरती चढण्यास भाग पाडले. पंकज खांबा वरती चढला व जसा त्याने विद्युत वाहक तारांना स्पर्श करतात तो तारांना चिटकला त्यात त्याचे पूर्ण शरीर काळपट झाले व त्याच ठिकाणी पंकज या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना काल दि.१४ जानेवारी रोजी दुपारी ३.१५ वाजेक्या घटनेनंतर पोलिसांच्या उपस्थितीत ७ तासानंतर रात्री १०.३० वाजेच्या सुमारास युवकाचा मृतदेह पोल वरून खाली काढण्यात आला.

    जिल्हा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रात्री सदर शेतकरी युवकाचा मृतदेह आणण्यात आला आहे. आज सकाळपासूनच जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात संतप्त नातेवाईक व गावकरी जमा झाले होते.त्यांनी अमळथे येथे विजेच्या खांबावर शेतकऱ्यांचा मृत्यूप्रकरणी. त्याच्या लहान भावाला नोकरी द्यावी व पन्नास लाख सानुग्रह मदत द्यावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. मागणी मान्य होत नाही तो पर्यंत मृतदेह घेणार नाही असा पवित्रा घेतला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता. त्याठिकाणी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना चर्चेसाठी बोलवण्यात आले असून सदर चर्चेच्या ठिकाणी खा.डॉ.हिना गावित व आ.डॉ.विजयकुमार गावित दाखल झाले त्यानंतर त्यांच्यात चर्चा करण्यात येत आहे.

    या बैठकीत युवकाच्या कुटुंबीयांना अंत्यविधीसाठी २० हजार रूपये देण्यात आले. तसेच शिक्षणा प्रमाणे नोकरीचे आश्वासन देण्यात आले असून ४ लाखाची भरपाई ही देण्याचे आश्वासन यावेळी वीज वितरणाच्या कर्मचाऱ्यांनी दिले. त्यानंतर १.३० वाजेच्या सुमारास मृतदेह गावाकडे नेण्यात आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : गोलाणी मार्केटमध्ये तरुणावर चाकूहल्ला आरोपीस अटक

    December 31, 2025

    Gangster Bandu Andekar’s House : अजित पवारांच्या पक्षाने कुख्यात गुंड बंडू आंदेकरांच्या घरात दिली २ तिकीटं; नव्या वादाला तोंड फुटणार?

    December 30, 2025

    Jalgaon:अवैध गांजाची साठवणूक करणाऱ्याला संशयिताला अटक

    December 29, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.