राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना कोरोनाची लागण

0
17

मुंबई, वृत्तसंस्था । आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेता आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (rupali chakankar) यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. रुपाली चाकणकर यांनी ट्विट करुन आपल्याला कोरोना झाल्याची माहिती दिली. “सौम्य लक्षणे जाणवल्यामुळे कोरोनाची चाचणी केली असता माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे जाणवल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी. लवकरच मी आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होईन”, असे चाकणकर यांनी म्हटलं आहे. रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना कोरोना झाल्याने नेते मंडळींच्या कोरोना (Corona) रुग्णसंख्येत आणखी वाढ झाली आहे.

राऊतांच्या कुटुंबातही कोरोनाचा शिरकाव
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ होत असून आमदार, खासदारांपासून ते अनेक मंत्रीमहोदयांनाही कोरोनाची लागण झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरीही चार जणांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. राऊत यांच्या आई, पत्नी, मुलगी आणि पुतणीची कोरोना चाचणी पॉझीटीव्ह (Positive) आल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून कोरोना बाधित राजकीय व्यक्तींचीही संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राज्यात आतापर्यंत 13 मंत्री आणि 70 हून अधिक आमदार कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीच याबाबतची माहिती काल दिली होती. राजकीय व्यक्ती आणि लोकप्रतिनिधी दररोज कामानिमित्त अनेकांच्या संपर्कात येत असतात. कामानिमित्त त्यांना फिरावच लागतं. लोकांना भेटावच लागतं. त्यामुळे आमदार (MLA) आणि मंत्र्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here