मुंबई, वृत्तसंस्था । राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (जि. पुणे) यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड जवळपास निश्चित झाली आहे. याबाबत गुरुवारी घोषणा होण्याची शक्यता आहे.दीड वर्षांपासून हे पद रिक्त आहे.
महिला अत्याचाराच्या घटना राज्यामध्ये वाढत असताना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महामंडळांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या होत्या. शिवसेना-भाजप युती सरकार काळात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती केली होती.