मुला-मुलींचे निरिक्षणगृहातील कंत्राटी पदभरतीची गुणवत्ता यादी जाहीर

0
25
भुसावळात आढळला एक नवीन रुग्ण; संख्या चारवरून पाचवर

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित मुलांचे व मुलींचे निरीक्षणगृह/बालगृह, जळगाव येथील कंत्राटी पदभरतीकरीता उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी करण्यात आली असुन, प्राप्त झालेल्या अर्जातील पात्र उमेदवारांची निवड करुन त्यांची प्राथमिक गुणवत्ता यादी Jalgaon.nic.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. अशी माहिती वनिता सोनगत, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

ज्या उमेदवारांनी या पदभरतीसाठी अर्ज केले आहेत व ज्यांना सदरील अर्जावर हरकत घ्यावयाची आहे, अशा उमेदवारांनी dwcwjal@gmail.com या मेलवर अथवा प्रत्यक्ष जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, आकाशवाणी जवळ, जळगाव या कार्यालयात 27 नोव्हेंबर, 2021 पर्यंत शासकीय सुटीचे दिवस वगळून लेखी हरकत नोंदवावी. या कालावधीनंतर प्राप्त झालेल्या लेखी हरकतींचा विचार करण्यात येणार नाही, असेही श्रीमती सोनगत, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here