चाळीसगाव : प्रतिनिधी
केंद्र सरकारने खतांच्या किमतीत केलेली दरवाढ त्वरीत मागे घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील व पदाधिकार्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे. खतांची दरवाढ मागे न घेतल्यास पक्षातर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, देण्यात भारतात पेट्रोलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. शंभर रुपयांच्यावर पेट्रोलचे दर गेलेले आहेत. केंद्र सरकारने आज सामान्यांना दुसरा धक्का दिला आहे. खतांच्या किमती भरमसाठ वाढविण्याचे काम भारत सरकारने केले आहे. १०.२६.२६ ची किंमत ६०० रुपयांनी वाढली आहे. डिएपीची किंमत जवळपास ७१५ रुपयांनी वाढली आहे. जो डिएपी ११८५ रुपयाला होता, तो आता १९०० रुपयांना मिळणार आहे. १०.२६.२६ चे पन्नास किलोंची बॅग ११७५ रुपयांत होती ते आता १७७५ रुपयांना मिळणार आहे. यासोबत पोटॅशच्याही किमती वाढविल्या आहेत. देशातल्या खतांची किंमत प्रचंड प्रमाणात वाढविण्याचे पाप भाजप सरकारने केले आहे.
निवेदन देतांना तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, प.स. सभापती अजय पाटील, नगरसेवक शाम देशमुख, रामचंद्र जाधव, सूर्यकांत ठाकूर, रोशन जाधव, दिपक पाटील, राकेश नेवे, अरुण पाटोल, योगेश पाटील, सुरेश पगारे, जिल्हा प्रवक्ते आकाश पाटील, युवक तालुकाध्यक्ष मोहित भोसले, युवक शहराध्यक्ष शुभम पवार, विद्यार्थी शहराध्यक्ष गौरव पाटील, पंजाबराव देशमुख, लेवेश राजपूत, सिद्धार्थ देशमुख, गुंजन मोटे, कौस्तुभ राजपूत, बाळासाहेब पोळ, रिकी सोनार, विशाल चौधरी आदि उपस्थित होते