पहूर येथे बाळशास्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन साजरा

0
62

जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील
पहूर येथे बाळशास्री जांभेकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला.

पहुर पत्रकार संघटना यांच्या वतीने गृप ग्रामपंचायत पहूर पेठ मध्ये बाळशस्री जांभेकर यांच्या प्रतिमांचे पुजन करून पहूर भागातील सर्व पत्रकार बांधवांचे स्वागत करून पत्रकार दिन साजरा केला.
त्या नंतर पत्रकार दिना निमित्ताने पहुर नगरीतिल सर्व पत्रकार बांधवांचे पहूर पेठ गृप ग्रामपंचायत,महात्मा फुले शिक्षण संस्था,पहुर पोलिस स्टेशन,भारतमाता पतसंस्था,आर.टि.लेले विद्यालय आणि आरोग्यदूत अरविंद देशमुख या सर्वांच्या वतीने पहूर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रविंद्र घोलप,उपअध्यक्ष ,किरण जाधव,सचिव शंकर भामेरे,सदस्य शांताराम लाठे,शरद बेलपत्रे,मनोज जोशी,प्रविण कुमावत,रविंद्र लाठे,गणेश पांढरे,जयंता जोशी,या सर्व पत्रकारांना रूमाल,टोपी,पेन,फुल,डायरी आणि अरविंद देशमुख यांच्या कडून सर्व पत्रकार बांधवांना सन्मानपत्र व भेट वस्तु देऊन स्वागत करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला.

या प्रसंगी पहुर पेठ ग्रा.पं.सरपंच निता पाटील,उप सरपंच शाम सावळे,माजी जि.प.सदस्य राजधर पांढरे,माजी प.स.सभापती बाबुराव घोंगडे,आरोग्यदुत अरविंद देशमुख,पहूर कसबे उप सरपंच राजु जाधव,ग्रा.पं सदस्य प्रदिप लोंढा,रवी मोरे,सलिम शेख,अशोक पाटील,समाधान पाटील,ईश्वर बारी,तेजस बावस्कर,चेतर रोकडे, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here