पहुर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील पहूर कसबे ग्रामपंचायत हद्दीतील वाघुर नदीतील फरशी वरील खड्डा त्वरित बुजविण्याची मागणी केली जात आहे.
पहूर येथील रहिवाशी पत्रकार किरण जाधव यांनी पहुर कसबे ग्रामपंचायतला निवेदन दिले असून त्या निवेदनात म्हटले आहेत की, पहूर कसबे ग्रामपंचायत हद्दीतील वाघुर नदीवरील फरशीवर मोठा खड्डा पडला असून या परशीवरून अनेक नागरिक मोटरसायकलवरून, पायी येत जात असतात तसेच शेतात जाणाऱ्या बैलगाड्या व छोटे वाहने या परशीवरुन वापरत असतात या परशीवरील खड्ड्यामुळे याठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता असून येथील खड्डा त्वरित व चांगला बुजवावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे निवेदनावर किरण जाधव यांची स्वाक्षरी आहेत.