कोरोना रुग्णासाठी निशुल्क ऑक्सिजन कंसेंटेटर उपलब्ध

0
16

 

जळगाव : प्रतिनिधी

गेल्या दीड वर्षांपासून सर्व नागरिक कोरोना सारख्या आजाराला धीराने तोंड देण्याचा प्रयत्न करीत आहेत, या आजारात अनेकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे, गेल्या काही दिवसात रुग्णालयात बेड न मिळणे, ऑक्सिजन कंसेंटेटर उपलब्ध न होणे, जीवरक्षक औषधी व इंजेक्शन चा तुटवडा यामुळे अनेक कुटुंबाने जिवाभावाची माणसं गमावली आहेत, तर अजूनही असंख्य लोकांची विविध प्रकारच्या उपचारासाठी धावपळ सूरु आहे, आज गृह विलगीकरणात असलेल्या बर्‍याच रुग्णांना ऑक्सिजन कंसेंटेटर ची गरज आहे आणि ही गरज पूर्ण करता यावी यासाठी भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशन आणि विनमार ओव्हरसीज पॉलीमर्स प्रा. लि., मुंबई च्या वतिने २५ ऑक्सिजन कंसेंटेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

सदरची हे मशीन कांताई नेत्रालयात उपलब्ध राहणार असून ज्या रुग्णांना याची गरज भासते आहे त्यांनी रुग्णास ऑक्सिजन ची गरज असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, किती लिटर ऑक्सिजन ची गरज आहे त्याचा तपशील ज्या रुग्णासाठी हवे आहे त्यांचे आधारकार्ड, पूर्ण पत्ता व इतर आवश्यक तपशील मशीन नेणार्‍याचे आधारकार्ड, ओळख असणार्‍या व्यक्तीचा संपूर्ण तपशील सादर करणे गरजेचे असेल. या फौंडेशनच्या वतीने निशुल्क दिली जाणारी ऑक्सिजन मशीन ही ५ लिटर क्षमतेची असणार आहेत. रुग्णास लागणार्‍या ऑक्सिजन कंसेंटेटरची गरज नसल्याचे चित्र लक्षात आल्यावर हे ऑक्सिजन कंसेंटेटर कांताई नेत्रालयास परत करावयाचे आहे .

ऑक्सिजन कंसेंटेटर अभावी कोणत्याही रुग्णास आपला जीव गमवावा लागू नये याच भावनेतून भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशनच्या वतीने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ऑक्सिजन कंसेंटेटरची गरज असणार्‍या रुग्णाच्या नातेवाईकांनी ऑक्सिजन कंसेंटेटरच्या उपलब्धते बाबत विजय मोहरीर (९४२३७७४३४६), सुधीर पाटील (९८२३३६२३३०), उदय महाजन (९४२२७७६७०८), अनिल जोशी (९४३२५९४४८७), नितीन चोपडा (९४२३४८९८२४), अमर चौधरी (९३७२४०९४६८) डॉ. प्रदीप ठाकरे (९४२२७७५९०६) कांताई नेत्रालय, निमखेडी रोड येथे संपर्क करावा असे आवाहन फौंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

भवरलाल ऍण्ड कांताबाई जैन फाउंडेशन

जैन उद्योग समुहाचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी १९८२ मध्ये सामाजिक उत्तरदायित्व जबाबदारी म्हणून जैन चॅरिटीज् ची स्थापना केली. ही संस्था आता कालांतराने भवरलाल अँड कांताबाई फौंडेशन अशी नोंदणीकृत झाली. समाजाला प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, अध्यात्म, पर्यावरण आणि जीवनावश्यक बाबी इत्यादी करीता मदतीची आवश्यकता असते. ही संस्था विविध जाती धर्माच्या गरजू, आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्यांना निरपेक्ष भावनेने मदत करीत असते. दातृत्वाचा हा वसा मोठेभाऊ अर्थात भवरलालजी जैन यांच्याकडून पुढच्या पिढीस मिळाला असून या संस्थेची व्याप्ती व कार्य वाढलेले आहे.

विनमार ओव्हरसीज पॉलीमर्स प्रा. लि. मुंबई

विनमार ओव्हरसीज पॉलीमर्स प्रा. लि. ही मुंबईस्थित पॉलीमर क्षेत्रातील जागतिक पातळीवरची मोठी कंपनी आहे. ही कंपनी गत ४० वर्षापासून या क्षेत्रात कार्यरत असून प्लास्टिक व केमिकल्सच्या वितरण व विपणण क्षेत्रात अग्रेसर आहे. ११०  देश अर्थात जगभरात कंपनीची विक्री व्यवस्था आहे. जग भरात सुमारे ५० कार्यालये या कंपनीचे आहेत. ही कंपनी सीएसआर निधीतून म्हणजेच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी (व्यावसायिक सामाजिक जबाबदारी) विविध सामाजिक लोककल्याणकारी कार्य करीत असते. विनमार व जैन इरिगेशन कंपनी आता कोविड-१९ च्या आव्हानात्मक परिस्थितीत मिळून मदत करण्यासाठी कटीबद्ध झालेली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here