कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कॅडेट, युथ निवड बुद्धिबळ स्पर्धा ऑनलाईन

0
23

जळगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या वतीने १८,१६,१४,१२ व १० वर्षांखालील मुला-मुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धा या वर्षी ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे खेळाडूंना घरबसल्या राज्य, राष्टीय जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे.
कोविड१९ च्या प्रादुर्भावामुळे गतवर्षी सर्व वयोगटातील व खुल्या निवड बुद्धिबळ स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. यावर्षीच्या सर्व स्पर्धा नेहमी सारख्या होतील असे वाटत होते परंतु मार्चपासून पुन्हा करोनाचा प्रादूर्भाव वाढल्यामुळे व परिस्थिति पुर्वपदावर येण्याची शक्यता कमी वाटल्यामुळे जागतिक बुद्धिबळ संघटनेने या विविध वयोगटातील जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा जुलैमध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे निश्चित केले. त्यानुषंगाने अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेनेही या सर्व निवड स्पर्धा १० जून पासून घेण्याची निश्चित केले व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनाही १८,१६,१४,१२ व १० वर्षांखालील मुला-मुलींच्या ऑनलाईन निवड बुद्धिबळ स्पर्धा ३ जून पासून सुरू करत आहे.या पाच गटातील बुद्धिबळ स्पर्धा मुले व मुलींच्या स्वतंत्र गटात स्पर्धा घेण्यात येणार आहे म्हणजे एकूण दहा गटात या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धा स्विस् लीगच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार एकूण नऊ फेर्यात ऑनलाईनने ’ टॉर्नेलो’ या संकेतस्थळावर होणार आहेत.
प्रत्येक गटातील स्पर्धा तीन दिवस चालणार आहे दररोज तीन फेर्‍या प्रमाणे एकूण नऊ फेर्‍या स्विस लीग पद्धतीने होणार आहेत. ‘टॉर्नेलो’ हे ऑनलाईन बुद्धिबळ खेळण्याचे नवीन व्यासपीठ असल्यामुळे प्रत्येक गटात सुरुवातीला ट्रायल राऊंडची एक फेरी होणार आहे.
प्रथम अठरा वर्षाखालील मुलांच्या व मुलींच्या स्पर्धा तीन ते पाच जून दरम्यान होणार आहे. सोळा वर्षाखालील मुलांची व मुलींची स्पर्धा सहा ते आठ जून दरम्यान होणार आहे. चौदा वर्षाखालील मुलांच्या व मुलींच्या स्पर्धा नऊ ते अकरा जून दरम्यान होणार आहेत. बारा वर्षाखालील मुलांच्या व मुलींच्या स्पर्धा बारा ते चौदा जून दरम्यान होणार आहेत.तर शेवटी दहा वर्षाखालील मुलांच्या व मुलींच्या स्पर्धा पंधरा ते सतरा जून दरम्यान होणार आहेत.
दहा गटातील प्रत्येक गटात रोख बक्षिसे पहिल्या पंधरा क्रमांकांना दिली जाणार आहेत. सर्व दहा गटात मिळून एकूण बक्षिसाची रक्कम दोन लाख पन्नास हजार रुपये आहे. अठरा वर्षाखालील मुलांच्या व मुलींच्या प्रत्येक गटास पहिल्या पंधरा क्रमांकांना रुपये तीस हजारची एकूण बक्षिसे ठेवली आहेत.सोळा वर्षाखालील मुलांच्या व मुलींच्या प्रत्येक गटात पहिल्या पंधरा क्रमांकांना रोख साडेसत्तावीस हजार रुपयाची एकूण बक्षिसे ठेवली आहेत. चौदा वर्षाखालील मुलांच्या व मुलींच्या प्रत्येक गटात पहिल्या पंधरा क्रमांकांना रोख पंचवीस हजार रुपये ची एकूण बक्षिसे ठेवली आहेत. बारा वर्षाखालील मुलांच्या व मुलींच्या प्रत्येक गटात पहिल्या पंधरा क्रमांकास रोख साडेबावीस हजार रुपयेची एकूण बक्षिसे ठेवली आहेत तर दहा वर्षाखालील मुलांच्या व मुलींच्या प्रत्येक गटात पहिल्या पंधरा क्रमांकांना रोखवीस हजार रुपयांची एकूण बक्षिसे ठेवली आहेत.
भाग घेणार्‍या इच्छुक बुद्धिबळपटूस प्रत्येकी सहाशे रुपये प्रवेश फी ठेवली आहे. प्रवेश फी ऑनलाईनने खालील संकेतस्थळावर फार्मसह भरावी. ुुु.लहशूूलळीलश्रश.लेा/र्शींशपींी प्रत्येक खेळाडूंनी अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे २५०/- रूपये भरुन खेळाडू रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. या ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा टॉर्नेलो या संकेत स्थळावर होणार आहे भाग घेण्यार्या खेळाडूंनी हींींिी://ुुु.ींेीपशश्रे.लेा या संकेत स्थळावर जाऊन आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.
बुधवारी दोन जूनला सकाळी दहा वाजता अठरा वर्षाखालील मुलांच्या व मुलींच्या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.त्यानंतर साडेदहा वाजता खेळाडू व व्यवस्थापकांची मीटिंग होईल व साडेअकरा वाजता ट्रायल राऊंडची एक फेरी होईल. गुरुवारी तीन जूनपासून रितसर स्पर्धा सुरू होईल.
अधिक माहितीसाठी आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले कोल्हापूर, मंगेश गंभीरे नाशिक, प्रवीण ठाकरे जळगाव, विलास म्हात्रे अलिबाग, सच्चिदानंद सोमण नागपूर, अंकुश रक्ताडे बुलढाणा, प्रकाश भिलारे मुंबई, सलील घाटे ठाणे, सुमुख गायकवाड सोलापूर, मनीष मारुलकर कोल्हापूर, चंद्रकांत वळवडे सांगली,हेमेंद्र पटेल औरंगाबाद यांच्याशी संपर्क साधावा असे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्थ मयूर व सचिव निरंजन गोडबोले यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here