साईमत जळगाव प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत जळगाव शहरातील सागर पार्कवर येत्या गुरूवारी १५ फेब्रुवारी रोजी युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरचे संमेलन यशस्वी करण्यासाठी भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी झोकून कामाला लागा असे आवाहन मंत्री ना.गिरीशभाऊ महाजन यांनी केले.
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानिमीत्त जळगाव क्लस्टर नियोजन बैठकीचे आयोजन भाजपच्या जिल्हा कार्यालयात सोमवारी १२ फेब्रुवारी रोजी दुपारी करण्यात आले होते. त्यात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मंत्री गिरीश महाजन बोलत होते.
यावेळी भाजपचे जळगाव जिल्हा पूर्व जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, जळगाव जिल्हा पश्चिम जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज, जळगाव महानगर जिल्हाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे, लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ.राधेश्याम चौधरी, नंदकुमार महाजन, भाजपचे प्रदेश सचिव अजय भोळे, खा.उन्मेश पाटील, माजी खा.डॉ. उल्हास पाटील, आ. राजूमामा भोळे , आ.मंगेश चव्हाण तसेच भाजपचे जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना युवा संमेलन यशस्वी करण्याच्या दृष्टीने मंत्री गिरीश महाजन यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी खासदार उन्मेश पाटील तसेच माजी खासदार डॉ. पाटील, आमदार मंगेश चव्हाण आणि आमदार राजूमामा भोळे यांनीही मनोगत व्यक्त केले. सचिन पानपाटील यांनी सूत्रसंचालन केले तर जळकेकर महाराज यांनी आभार मानले.