पाचोऱ्यात रिपाइं आठवले पक्षाची तालुकास्तरीय बैठक

0
15

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

येथील राजीव गांधी टाऊन हॉलमध्ये रविवारी, १० मार्च रोजी रिपाइं आठवले पक्षाच्या कार्यकर्त्यांची तालुकास्तरीय बैठक घेण्यात आली. रिपाइं आठवलेचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, जळगाव पश्‍चिम जिल्हाध्यक्ष आनंद खरात यांचे पाचोरा शहरात आगमन होताच ढोल-ताश्‍यांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

सर्वप्रथम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून परिसरात ढोल ताशे वाजवत मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. बैठकीत रिपाइंच्या ज्येष्ठ नेत्या सत्यभामा अहिरे, रिपाइंचे ज्येष्ठ नेते आनंद नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा तालुकाध्यक्ष विनोद अहिरे, युवक तालुकाध्यक्ष भैय्यासाहेब बागवान, शहराध्यक्ष शशिकांत मोरे, महिला तालुकाध्यक्षा प्रियंका सोनवणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.

रिपाइंचे युवा नेते सुदाम सोनवणे यांनी पक्षाची भूमिका आणि आपल्या नेतृत्वाखाली काम करत असताना कार्यकर्त्यांची भावना ओळखून त्यांना मदत करण्याचे आश्‍वासन दिले. जळगाव महानगरचे युवक अध्यक्ष यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच रिपाइंचे जळगाव पश्‍चिमचे जिल्हाध्यक्ष आनंद खरात यांनी सर्व महामानवांचे आणि महामातेचे स्मरण करून आपल्या जोरदार भाषणातून सुरुवात करून विविध विषयांवर हात घालून मनोगत व्यक्त केले.

महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील मोठा घटक पक्ष असलेला रिपाइं आठवले पक्षाला महायुतीतून लोकसभेच्या दोन जागा देण्यात यावी, त्यात स्वतः ना. डॉ.रामदास आठवले यांना शिर्डी मतदारसंघ तर राज्याध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांना सोलापूर मतदार संघ द्यावा. कारण ह्या दोन्ही जागा राखीव असल्याने महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची मनापासून तीव्र भावना आहे, असे मत व्यक्त केले.

अध्यक्षीय मनोगतात जिल्हाध्यक्ष राजु सूर्यवंशी म्हणाले, रिपाइंचे अध्यक्ष ना.रामदास आठवले यांचे कार्य अनमोल आहे. ते सर्व गरजू जनतेच्या हितासाठी काम करत असताना तुम्हीही पक्षाचे हित ओळखून पक्षाची शक्ती वाढवली पाहिजे. म्हणून समाजाच्या प्रत्येक घटकांनी रिपाइंच्या विचारांशी एक झाले पाहिजे तरच पक्ष मोठा होईल, असे मत व्यक्त केले.
बैठकीला रिपाइं जळगाव जिल्हा युवा कार्याध्यक्ष धर्मजित खरात, किशोर मोरे पहिलवान, सुनील जावरे, भीमा खरे, अंकुश ठाकरे, विलास भास्कर, विष्णू भालेराव, प्रमोद पारदे, नंदू पारदे, गोलू पंडित, प्रकाश बनसोडे यांच्यासह कार्यकर्ते, महिला पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन आनंद नवगीरे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here