साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी
गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक बघता आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले. दरम्यान, प्रशासनाने चाळीसगाव पाचोरा भडगाव परिसरातील गिरणा नदीकाठील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गेल्या दोन दिवसापासून परतीच्या मानसूनचा पाऊस सूरू आहे. गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही दमदार पाऊस झाला असून पावसाची रिपरिप सूरूच आहे. त्यामुळे गिरणा धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने आज सकाळी ७ वाजता ६ वक्रद्वार उघडण्यात आले आहे. यात क्रमांक ३ व ४ हे प्रत्येकी १ फुटने उघडण्यास आले आहे. सध्यस्थितीत धरणाचे ६ वक्रद्वार १ फुटाने उघडे असून त्याद्वारे गिरणा नदीपात्रात 7332क्यूसेस पाण्याच्या विसर्ग गिरणा नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे. तर चाळीसगाव पाचोरा भडगाव परिसरातील नदीकाठील गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.