साईमत, चोपडा : प्रतिनिधी
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या आदेशाने आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्षयरोगबाबत जनजागृती करणे सुरु आहे. त्यामध्ये तालुक्यातील किशोर सैंदाणे, प्रमोद पाटील, कमलेश बडगुजर आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत स्वातंत्र्यदिनी विविध ठिकाणी जनजागृती केली. प्रत्येक गावात जावून ग्रामसभा, शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी, विषयावर परीक्षा घेऊन त्यांनी जिल्ह्यातील तसेच संपूर्ण तालुक्यात क्षयरोग आजारावर जनजागृती करणार आहेत.
स्वातंत्र्य दिनानिमित्त वडगाव बु. आणि सुटकार येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत, ध्वजारोहणाप्रसंगी राष्ट्रीय क्षयरोग निवारण कार्यक्रमांतर्गत उपस्थित विद्यार्थ्यांकडून क्षयरोग आजाराबाबत व त्याकरीता मिळणाऱ्या मोफत औषधी याविषयी सखोल माहिती देत मार्गदर्शन केले. या अभियानांतर्गत ग्रामीण भागातील लोकांपर्यंत क्षयरोगाबाबत जनजागृती होणे हा एकमेव उद्देश आहे. प्रशासनाने परिपत्रकातून दिलेली क्षयरोगाची प्रतिज्ञा तथा शपथपत्र हे सर्व उपस्थितांकडून आरोग्य सेवक-विजय देशमुख यांनी वदवून घेतली.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी समुदाय आरोग्य अधिकारी भूषण देशमुख, आजी-माजी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य, नामदेव पाटील, योगेश पाटील, कडू पाटील, वासुदेव कोळी, प्रवीण खेमणार, शिक्षक-जितेंद्र चौधरी, चंदन पाटील, ग्रामसेवक के. एम. पाटील, जयवंत पाटील, आशावर्कर, अंगणवाडी सेविका यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. भूषण देशमुख यांनी आभार मानले.