पाटलांना मंत्रिपद तर प्रदेशाध्यक्षपदासाठी राम शिंदे व आशिष शेलारांचे नाव पुढे

0
12

मुंबई : साईमत लाईव्ह प्रतिनिधी

राज्यातील सत्तेतून मागील अडीच वर्षांपासून दूर असलेल्या भाजपने शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या मदतीने पुन्हा एकदा सत्तेत पुनरागमन केलं आहे. आता नवे सरकार स्थापन झाल्यानंतर खातेवाटपाकडे सर्वांचं लक्ष लागलेले आहे. शिंदे गट आणि भाजपमध्ये कुणाला मंत्रिपद मिळणार असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. अशातच आता भाजपमध्ये मोठे खांदेपालट केले जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा मंत्रिमंडळात समावेश जवळपास निश्चित झाला आहे. त्यामुळे लवकरच नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बहुमत सिद्ध केल्यानंतर लवकरच खातेवाटप केले जाणार आहे. तर दुसरीकडे, नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आता भाजप संघटनात्मक बदलासाठी हालचाली वाढल्या आहेत. भाजप प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी नव्या चेहऱ्याला सोपवण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी आशिष शेलार (Ashish Shelar) आणि राम शिंदे (Ram Shinde) या दोन नेत्यांची नावे सर्वात पुढे आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे सरकारमध्ये आता खातेवाटपाच्या हालचाली वाढल्या आहेत. महसूल मंत्रिपदावरून भाजपमध्ये खलबत सुरू आहे. भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना महसूल खाते हवे आहे. पण महसूल खाते कुणाला द्यावे यावरून भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. याआधीही महसूल खाते हे चंद्रकांत पाटील यांच्याकडेच होते. याहीही वेळी चंद्रकांत पाटील हे महसूल खात्यासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here