साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर
उच्च व तंत्र शिक्षण विभाग कला संचालनालय महाराष्ट्र राज्य शासकीय ग्रेड चित्रकला परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट २०२३ -२४ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात सलग १७ व्यावर्षी १०० टक्के निकाल लागला आहे. याबद्दल विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
एलिमेंटरी ग्रेड परीक्षेतील ‘ए’ ग्रेडमध्ये तीन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्यात जान्हवी सचिन बावस्कर, गायत्री अरविंद बोडखे, जान्हवी प्रमोद दातीर तसेच ‘बी’ ग्रेडमध्ये सहा विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्यात प्रतीक्षा योगेश चौधरी, अमृता शंकर खाटीक, अश्विनी यशवंत मोरे, हेमंत राजेंद्र निंबाळकर, नंदिनी प्रमोद सोनवणे, सानिया सत्तार तडवी यांचा समावेश आहे. इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत ‘ए’ ग्रेडमध्ये सहा विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्यात जान्हवी महेंद्र बनकर, राजश्री कैलास बनकर, रामेश्वर एकनाथ भडांगे, राधिका रवींद्र बोरसे, निकिता पुंडलिक घोंगडे, विजय दिलीप सोनवणे तसेच ‘बी’ ग्रेडमध्ये १२ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. त्यात तानेश योगेश बनकर, गायत्री कैलास बेलदार, तनुश्री गोरख चौधरी, वैशाली श्रीकृष्ण द्राक्षे, हर्षल श्रीकृष्ण घोंगडे, विशाल दिनकर घोंगडे, सिद्धी भगवान जाधव, संचिता रंगनाथ जाधव, प्रीतम दिलीप महाजन, कमलेश जगदीश पांडव, निखिल उत्तम पांडव, प्रणव सुनील सपकाळ यांचा समावेश आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना कलाशिक्षक डी.वाय. गोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन ना.गिरीश महाजन, व्हा.चेअरमन साहेबराव देशमुख, सचिव डॉ.अनिकेत लेले, मुख्याध्यापक एस. व्ही.पाटील, पर्यवेक्षक एस. आर. सोनवणे, वरिष्ठ लिपीक किशोर पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.