साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी विजय चौधरी
शेतात कापूस वेचणी करणाऱ्या शेतकरी महिलेला बांधावरील मंदिरावर बोलावून दोघे भामट्यांनी गुंगीचे बिस्कीट देऊन महिलेच्या गळ्यातील सात ग्रॅमचे मंगळसूत्र अंदाजे किंमत ३५ हजार रु.भरदिवसा लांबवून पोबारा केल्याची घटना रविवारी नऊ वाजेच्या सुमारास घडली याप्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात महिलेच्या फिर्यादीवरून अज्ञात भामट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जरंडी शिवारात सोयगाव-बनोटी रस्त्यालगत असलेल्या स्वमालकीच्या शेतात गट क्र-३७५ मध्ये सुमनबाई रामदास गोरे(महाजन) या कापूस वेचणी करत असताना बनोटी कडून दुचाकीवरून येणाऱ्या दोघांनी सुमनबाई गोरे यांना शेतीच्या बांधावर असलेल्या मंदिरावर बोलावून त्यांच्या पिशवीतील पाच-पाचशेच्या दोन नोटा काढून दोघे भामट्यांनी महिलेला सांगितले की,आमच्या आईची प्रकृती चिंताजनक आहे.
या नोटाना तुमच्या गळ्यातील मंगळसूत्राचा स्पर्श करा,मंगळसूत्र चा स्पर्श झाल्या वर आमच्या आईची तब्बेत ठीक होणार आहे असे आम्हाला मांत्रिकाने सांगितले आहे असे महिलेला सांगून तिने गळ्यातील सात ग्रॅमचे मंगळसूत्र काढताच भामट्यांनी मंगळ सूत्र हिसकावून चाळीसगाव कडे पलायन केले.दरम्यान काहीकाळ या महिलेची शुद्ध हरवली होती त्यामुळे दोघे भामट्यांनी सुमन बाईला हा प्रकार करण्या आधी गुंगीचे बिस्कीट खाण्यास दिल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे..मंगळसूत्र हिसकताच या भामट्यांच्या हातात असलेली पिशवी ज्यामध्ये बिस्कीट पुडे, मंत्रिकांचा साहित्य, अघोरी विद्येचे साहित्य आढळून आले आहे त्यामुळे हे भामटे भोंदु बाबाही असू शकतात असा कयास पोलिसांनी काढला आहे. दरम्यान सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शेतात पंचनामा केला भामट्या ची पिशवी पोलिसांनी हस्तगत केली आहे.सुमनबाई गोरे(महाजन) यांच्या फिर्यादीवरून सोयगाव पोलीस ठाण्यात दोन अज्ञातांच्या विरोधात चोरीच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरट्यांचा धुमाकूळ…. जरंडी परिसर हादरला
जरंडी परिसरात दिवाळी सणाच्या सलग चार दिवस कापूस चोरी, शुक्रवारी रात्री पुन्हा गावालगत शेतात कापूस चोरी झाल्याने आधीच शेतकरी हवालदिल झालेला असतांना आता चोरट्यांनी कापूस वेचणी करणाऱ्या मजुरांवर दहशत पसरविली आहे. महिलेच्या मंगळसूत्र चोरीच्या घटनेने जरंडी परिसर हादरला आहे सलग आठ दिवस जरंडीत चोरीच्या सत्रांनी डोकेवर काढले मात्र सोयगाव पोलीस केवळ अवैध धंद्याच्या आर्थिक व्यवहारात गुरफटून गेले असल्याचे ग्रामस्थ सांगतात.जरंडीला पोलीस येणे म्हणजे केवळ अवैध धंद्याच्या आर्थिक व्यवहारासाठी त्यामुळे जरंडी ग्रामस्थांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास कमी झाला आहे.एकिकडे शेतकरी कापूस चोऱ्याच्या भितीने त्रस्त असून दुसरीकडे मात्र पोलीस प्रशासन हात बांधून आहे.शेतात गांजाची झाडे असल्याची माहिती मिळाली की पोलीस जशी तत्परता दाखवितात तशीच तत्परता पोलिसांनी जरंडीच्या चोरीच्या सत्रात दाखवावी अशी मागणी थेट शेतकऱ्यांनी केली आहे…