भाजपची मदतच करायची असेल तर उघडपणे करा : सुषमा अंधारे

0
21

मुंबई: प्रतिनिधी
मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यभरात पेटला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षण देण्यासाठी २४ डिसेंबर पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांना ओबीसी नेत्यांकडून विरोध होत आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत भाष्य केलं होते. यावेळी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही निशाणा साधला होता. त्यावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तुम्हाला भाजपची मदत करायची असेल तर उघडपणे करा असे सुषमा अंधारे यांनी म्हटले
आहे.
जातीयवाद निर्माण करून महाराष्ट्राची शांतता भंग केली जात आहे. निवडणूकीच्या तोंडावर हे सर्व प्रकार सुरू होत आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या मागून कोण बोलत आहे हे कालांतराने कळेल, असे राज ठाकरे यांनी ठाण्यात माध्यमांशी बोलताना म्हटले होते. त्यावेळी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवरही निशाणा साधला होता. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर त्यांच्याकडून जातीय द्व्‌ोष केला गेला असे राज ठाकरे म्हणाले होते.
“राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना १९९९ मध्ये झाली. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातींचा द्वेष निर्माण करण्याचे काम सुरू झाले. प्रत्येकाला आपली जात आवडते. त्यामागे अनेक कारणे असतात. खाद्य संस्कृती हे एक कारण आहे. पण, कुणी इतर जातीचा द्वेष करत नाही. हे राष्ट्रवादीने सुरू केले. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर त्यांच्याकडून जातीय द्वेष केला जात असल्याचे मी १९९९ नंतर ठाण्यात सांगितले होते. त्यामुळे महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश आणि बिहार होत आहे. राज्यात जातीवाद वाढला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here