साईमत लाइव्ह मुंबई प्रतिनिधी :-
शिवसेनेचे एक पर्व गाजवणारे धडाडीचे नेते म्हणून आनंद दिघे (Anand Dighe) यांना ओळखले जायचे. १३ मे रोजी दिघेसाहेबांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला . इतकेच नाही तर ‘धर्मवीर’ चित्रपटाला ‘कै. शाहीर दादा कोंडके स्मृती गौरव सन्मान’ मिळाला आहे. अभिनेता प्रसाद ओक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे आभार मानत सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली. प्रसाद ओक (Prasad Oak) यांनी चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे.
प्रसाद ओक यांनी पोस्टमध्ये म्हटले की, ‘धर्मवीरसाठी या वर्षीचा ‘दादा कोंडके स्मृती गौरव सन्मान’ मला मिळाला. हा सन्मान मी मा. आनंद दिघे साहेबांना समर्पित करतो. ही संधी मला दिल्याबद्दल दिग्दर्शक मित्र प्रवीण तरडे आणि निर्माते मित्र मंगेश देसाई यांचे मनःपूर्वक आभार. त्याचबरोबर खा.मा. श्रीकांतजी शिंदे आणि मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचेही मनःपूर्वक आभार.’ असे ओक यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. ‘धर्मवीर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे.
दरम्यान धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणं, हिंदूंच्या पाठी ठाम उभं राहणं, महिलांना सुरक्षितता देणं, सामाजिक तंटे सोडवणं, ठाण्याचा विकास करणं अशी अनेक कामं केली आहेत. त्यामुळे ते शिवसेनेचे एक पर्व गाजवणारे नेते ठरले.