साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे बी.पी.आर्ट्स, एस.एम.ए. सायन्स अँड के.के.सी. कॉमर्स आणि के.आर.कोतकर ज्युनिअर कॉलेज येथे आझाद हिंद सेनेचे संस्थापक स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ. ए. व्ही. काटे, उपप्राचार्य प्रा. डी. एल. वसईकर, उपप्राचार्य ए. आर. मगर तसेच कार्यालयीन अधीक्षक हिम्मत अंदोरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन, माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. काटे यांनी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याचा गौरव करून मनोगतात त्यांनी त्यांचे विचार आणि त्यांचे कार्य यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी उत्सव समितीचे सदस्य प्रा. के. डी. पाटील यांनी आभार मानले.



