Author: Saimat

साईमत यावल प्रतिनिधी यावल नगरपरिषदेत विषय समितीच्या सभापतींची निवड दि. १९ जानेवारी रोजी नगरपरिषदेच्या सभागृहात संपन्न झाली. या सर्वसाधारण सभेत महाविकास आघाडीच्या तिन समित्यांना सभापतीपद मिळाले, तर भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी (अप) गटाने एकत्र येऊन २ सभापतीपदांची संधी मिळवली. नगरपरिषदेच्या सभेत पिठासीन अधिकारी तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांच्या अध्यक्षतेखाली, मुख्याधिकारी निशीकांत गवई आणि सह मुख्याधिकारी रविकांत डांगे उपस्थित होते. याशिवाय नगराध्यक्ष सौ. छाया अतुल पाटील आणि उपनगराध्यक्ष सईदा बी याकुब शेख तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. सभापती निवडीचे महत्त्वाचे निर्णय स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्ष सौ. छाया अतुल पाटील यांची निवड झाली, ज्या गटाचे सहा पैकी चार सदस्य असल्यामुळे…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव, दि. १९ जानेवारी २०२६ – जळगाव लोकसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना मोठा धक्का मिळाला आहे. खासदार स्मिताताई वाघ यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर केंद्र शासनाने गिरणा नदीवरील नवीन बांभोरी पुलाच्या उभारणीसाठी ७९ कोटी २३ लाख ३९ हजार ६४८ रुपये मंजूर केले आहेत. हा पूल नॅशनल हायवेवर येणार असून, वाढत्या वाहतुकीच्या ओझ्यामुळे निर्माण होणाऱ्या कोंडीची समस्या कमी करण्यासाठी अत्याधुनिक PSC Girder (Pre-Stressed Concrete Girder) तंत्रज्ञान वापरून बांधला जाणार आहे. नवीन पूलामुळे शहरातील वाहतूक सुरळीत होईल तसेच जळगावचा चेहरामोहरा बदलून राहील, असा विश्वास स्थानिक आणि अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. स्मिताताई वाघ म्हणाल्या, “जळगावच्या सर्वांगीण विकासासाठी हा प्रकल्प एक महत्त्वाचा टप्पा…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे उघड उल्लंघन झाल्याच्या निषेधार्थ भारत मुक्ती मोर्चातर्फे देशभरात टप्प्याटप्प्याने आंदोलन छेडण्यात आले असून, त्याचाच भाग म्हणून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. ओरिसा राज्यातील कटक येथे आयोजित करण्यात आलेल्या बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनांना ऐनवेळी परवानग्या रद्द करून रोखण्यात आल्याच्या घटनेविरोधात हे आंदोलन करण्यात आले. दि. २६ ते ३० डिसेंबर २०२५ दरम्यान ओरिसा राज्यातील कटक येथील बलियात्रा लोअर ग्राऊंडवर बामसेफ व राष्ट्रीय मूलनिवासी संघाचे ४२ वे राष्ट्रीय अधिवेशन तसेच भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. बामसेफचे अधिवेशन ओबीसी जातीनिहाय जनगणनेला समर्पित होते, तर भारत मुक्ती मोर्चाचे…

Read More

साईमत मुंबई प्रतिनिधी भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंह सध्या एक मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. २१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वीच त्याच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील अलिगड येथील सासनी गेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली आहे. माहितीनुसार, रिंकूने नुकतीच सोशल मीडियावर एक रील शेअर केली होती. या व्हिडिओमध्ये त्याने क्रिकेटमधील यशाचे श्रेय देवाला दिले, परंतु व्हिडिओमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) सहाय्याने भगवान हनुमान, भगवान विष्णू, भगवान शिव आणि श्री गणेश यांना एका कारमध्ये चष्मा घालून बसलेले दाखवण्यात आले आहे. त्याच व्हिडिओमध्ये रिंकू मैदानात षटकार मारताना दिसत आहे. देवतांचे अशा प्रकारे चित्रण झाल्यामुळे…

Read More

साईमत मुंबई प्रतिनिधी देशभरात डिजिटल व्यवहाराचा वेग वाढत असतानाही, लहान व्यापारी आणि सामान्य नागरिकांसाठी UPI चा मोफत फायदा भविष्यात संकटात पडू शकतो. गेल्या काही वर्षांत UPI (यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) ही देशातील डिजिटल पेमेंटची मुख्य साधन झाली आहे. आकडेवारीनुसार, देशातील सुमारे 85% डिजिटल व्यवहार UPI द्वारे केले जातात. फक्त 2025 च्या ऑक्टोबरमध्येच 20 अब्जाहून अधिक व्यवहार UPI द्वारे झाले, ज्याची किंमत अंदाजे ₹27 लाख कोटी आहे. तथापि, या यशामागे एक मोठे आव्हान दडले आहे. केवळ 45% व्यापारी नियमितपणे UPI स्वीकारत आहेत, तर काही भागातील जवळजवळ एक तृतीयांश पिनकोडमध्ये 100 पेक्षा कमी सक्रिय व्यापारी आहेत. “द इकॉनॉमिक टाईम्स”च्या अहवालानुसार, सध्या UPI व्यवहार…

Read More

साईमत मुंबई प्रतिनिधी महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष महापौरपदाच्या आरक्षणाकडे लागले आहे. शहराचा प्रथम नागरिक कोण असणार, याची दिशा ठरवणारी महत्त्वाची आरक्षण सोडत येत्या गुरुवार, २२ जानेवारी २०२६ रोजी मंत्रालयात होणार असून, या प्रक्रियेमुळे राज्यातील राजकारणात मोठी हालचाल निर्माण झाली आहे. राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, २९ महानगरपालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची अधिकृत सोडत २२ जानेवारी रोजी काढण्यात येणार आहे. ही प्रक्रिया नगर विकास राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून, मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात सकाळी ११ वाजल्यापासून सोडतीस सुरुवात होईल. या सोडतीत अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागास प्रवर्ग (OBC) तसेच…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी मंगळवारी १३ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास जळगाव ते शिरसोली दरम्यानच्या रेल्वे मार्गावर एका अनोळखी ३० ते ४० वर्षीय पुरूषाचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. ही माहिती रेल्वे लोकोपायलटने ताबडतोब जळगाव तालुका पोलीस ठाण्यास दिली. घटनास्थळी पोलीस तातडीने दाखल झाले आणि पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ताब्यात घेतला गेला. मयताची ओळख पटेल अशी कोणतीही वस्तू, कागदपत्र किंवा आयडी मिळालेली नाही. या घटनेनंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक पोहेकॉ प्रकाश चिंचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, घटनास्थळी पाहणी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बयानांचा आधार घेऊन…

Read More

साईमत वृत्तसेवा कीव्ह/मॉस्को: गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया–युक्रेन युद्धाने पुन्हा एकदा भीषण वळण घेतले आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि तीव्र हवाई हल्ला चढवला असून, रात्रभर शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माऱ्याने युक्रेनमध्ये प्रचंड हाहाकार उडाला आहे. या हल्ल्यामुळे अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला असून, कडाक्याच्या थंडीत नागरिकांचे हाल वाढले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध थांबवण्यासाठी रशिया आणि युक्रेनच्या नेतृत्वाशी अनेक बैठका घेतल्या असल्या, तरी अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. उलट, दोन्ही देशांमधील संघर्ष अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र या ताज्या हल्ल्यामुळे स्पष्ट झाले आहे. 293 ड्रोन आणि 18 क्षेपणास्त्रांचा मारा युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने…

Read More

साईमत प्रतिनिधी विकसित भारत युवा नेते संवाद (VBYLD) या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमाच्या समारोप समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या भविष्यासंदर्भात दूरदृष्टीपूर्ण आणि ठाम भूमिका मांडली. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय आणि केंद्रीय राज्यमंत्री  रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात तरुणाईची ऊर्जा, नवविचार आणि राष्ट्रनिर्मितीची सामूहिक भावना ठळकपणे जाणवली. समारोपप्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताच्या विकासाची दिशा ठरवण्यात तरुणांची भूमिका निर्णायक आहे. सक्षम, जागरूक आणि नेतृत्वक्षम तरुण हेच ‘विकसित भारत’ या संकल्पनेचे खरे शिल्पकार आहेत. देशाच्या लोकशाही व्यवस्थेत तरुणांचा सक्रिय सहभाग, महिलांच्या नेतृत्वाखालील विकास, ‘फिट भारत–हिट भारत’ आणि भविष्यासाठी सज्ज मनुष्यबळ उभारणी यासारख्या विषयांवर VBYLDच्या…

Read More

साईमत वृत्तसेवा मकरसंक्रांतीसारख्या शुभ सणाच्या तोंडावरच सराफा बाजारातून सर्वसामान्य ग्राहकांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असून, मंगळवार (दि. १३ जानेवारी २०२६) रोजी देशभरात सोने-चांदीच्या भावात मोठा फेरबदल नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे १० ग्रॅम सोन्याची किंमत पाहून अनेक ग्राहक थक्क झाले आहेत. सराफा बाजारात सोन्याचे दर आधीच गगनाला भिडले असताना, आज पुन्हा एकदा दरवाढ झाल्याने सणासुदीच्या काळात दागिने खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे. दुसरीकडे चांदीच्या दरातही लक्षणीय बदल पाहायला मिळत असून गुंतवणूकदारांचे लक्ष या घडामोडीकडे लागले आहे. देशातील आजचे सोने-चांदीचे दर बुलियन मार्केटच्या माहितीनुसार, आज देशात १० ग्रॅम २४ कॅरेट…

Read More