जळगाव ः प्रतिनिधी
प्रत्येकाच्या जीवनात लग्न वाढदिवस हा एक अविस्मरणीय क्षण असतो.तो आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्रत्येक जण साजरा करत असतो. पण ज्यांना समाजकार्याची आवड असते ते आपला आनंदी क्षण देखील समाजासाठी घालवतात. महापौर जयश्रीताई महाजन , वृक्षसंवर्धन समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर नेवे, महिल पर्यावरण सखी मंच राज्य उपाध्यक्ष मनिषा पाटील ,पर्यावरण प्रतिनिधी वसंतराव पाटील, मनोहर शिंदे यांनी काल आपल्या लग्नाचा वाढदिवस संत सावता नगर येथे वृक्षरोपण करून साजरा केला.
एवढेच नव्हेतर पर्यावरण व निसर्ग वाचविण्यासाठी फक्त वृक्षरोपणच नाही तर त्या वृक्षांची संवर्धनाची जबाबदारी देखील स्वीकारली. यात प्रामुख्याने कडुलिंब ,कदंब अर्जुन ,पाखड, बेहडा, करंज, जांभूळ,काशीद या वृक्षांची लागवड करण्यात आली.
आपल्या लग्नाचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करून आदर्श निर्माण करणाऱ्या या मान्यवरांचे कार्य अभिमानास्पद असून समाजासमोर आदर्श ठेवला आहे. महापौर जयश्रीताई महाजन यांनी मनोगत व्यक्त केले तर चंद्रशेखर नेवे यांनी प्रास्ताविकात प्रत्येकाने वाढदिवसाच्या दिवशी वृक्षरोपण करावे असे आवाहन केले. आभार वसंत पाटील यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी महापौर जयश्रीताई महाजन, नगरसेवक डॉ चंद्रशेखर पाटील,नगरसेवक मनोज चौधरी, मनिषा पाटील,पद्मजा नेवे,मनोहर शिंदे ,राजेंद्र पाटील ,राजेंद्र महाजन,मधुकर चौधरी, मनोहर महाजन, किरण पाटील ,कृष्ण देशमुख, महेश पवार,भाग्यश्री महाजन,डी.बी.साळुंखे उपस्थित होते.या उपक्रमासाठी कॉलनीतील सर्व रहिवाशांचे सहकार्य लाभले.