Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»राज्यातील २४ जिल्ह्यातील १२ हजार ७६८ कोटीच्या एक हजार ४८० कि.मी. दुपदरी सिमेंट क्रॉकिंट रस्त्यांचे भूमिपूजन
    मुंबई

    राज्यातील २४ जिल्ह्यातील १२ हजार ७६८ कोटीच्या एक हजार ४८० कि.मी. दुपदरी सिमेंट क्रॉकिंट रस्त्यांचे भूमिपूजन

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoOctober 11, 2024No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची ऑनलाईन उपस्थिती

    मुंबई । न.प्र.

    सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित (एडीबी) महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प टप्पा-३ अंतर्गत राज्यातील २४ जिल्ह्यातील ४४ विधानसभा मतदारसंघातील १२ हजार ७६८ कोटी रुपये किंमतीची एक हजार ४८० कि.मी. लांबीच्या दुपदरी सिमेंट क्रॉकिंट रस्त्यांचे भूमिपूजन एकाच वेळी त्या-त्या ठिकाणी पार पडले. मुख्य भूमिपूजन समारंभ ऑनलाईन पध्दतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

    यावेळी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा पाटणकर म्हैसकर, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बृजेळ दिक्षित, सचिव सदाशिव साळुंखे, सचिव संजय दशपुते, माजी आमदार प्रमोद जठार, मुख्य अभियंता राजभोज यांच्यसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे व महामंडळाचे अधिकारी मंत्रालयातील ऑनलाईन समारंभस्थळी उपस्थित होते.
    राज्यातील रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून ए.डी.बी. अर्थात आशियाई विकास बँकेकडून अर्थसहाय्य घेण्याचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला. आशियाई विकास बँक प्रकल्पाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण ९१९ कि.मी. लांबीच्या रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली. त्यापैकी ४५० कि.मी. लांबीचे रस्ते पूर्ण झाले असून उर्वरित ४६९ कि.मी. लांबीच्या रस्त्यांची कामे प्रगतीपथावर असून ७५ टक्के कामे पूर्ण झाली आहेत.

    सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित (एडीबी) महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प टप्पा-३ अंतर्गत १२ हजार ७६८ कोटी रुपये किंमतीची १ हजार ४८० कि.मी. लांबीच्या दुपदरी सिमेंट काँक्रीट रस्त्यांची ४४ कामे राज्यात विविध मतदारसंघात हाती घेण्यात आलेली असून यामध्ये एडीबीकडून ५०० दशलक्ष अमेरिकन डॉलर (४ हजार १५० कोटी रुपये) इतके अर्थसहाय्य प्राप्त होणार आहे. उर्वरित रक्कम केंद्र शासन सहाय्य व राज्य शासनाच्या अर्थसंकल्पातून उपलब्ध होणार आहे.

    एडीबीच्या माध्यमातून होणाऱ्या कामांमध्ये जिल्हानिहाय कामे पुढीलप्रमाणे-

    लातूर-२, जालना व परभणी-२, हिंगोली -२, बुलढाणा -३, यवतमाळ -१, छत्रपती संभाजीनगर -३, बीड -२, धाराशिव -१, नंदुरबार -१, जळगाव -३, धुळे -२, अहमदनगर -४, सोलापूर -२, सिंधुदुर्ग -२, ठाणे -१, सातारा -१, कोल्हापूर -१, पुणे -४, पालघर -१, नाशिक -१, नागपूर -३, चंद्रपूर -१, वर्धा -२ अशी २४ जिल्ह्यातील एकूण ४४ मतदार संघातील कामे समाविष्ट आहेत. या कामांच्या जाहीर निविदा बोलावून ठेकेदार निश्चिती करण्यात आली आहे. लवकरच कामे सुरु होणार आहेत.

    रस्त्यांमुळे तेथील गावांमधील नागरिकांचा रोजचा प्रवास सुखकर होणार आहे. तसेच औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील वाहतूक सोयीची होणार आहे. तसेच धार्मिक स्थळे व पर्यटन स्थळे चांगल्या दज्यांच्या रस्त्यांनी जोडली जाणार आहेत. त्यामुळे नवीन उद्योग निर्मिती होऊन स्थानिक नागरिकांसाठी रोजगार उपलब्ध होणार आहेत.

    पर्यावरण संवर्धनासाठी रस्त्याच्या दुतर्फा अंदाजे ३,००,००० झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच या प्रकल्पांतर्गत Bridge cum Bandhara बांधण्यात येणार आहेत व त्यामुळे लगतच्या भागाची पाण्याचो पातळी उंचावण्यास मदत होणार आहे. रस्त्याच्या लांबीमधील शाळांमध्ये शालेय विद्यार्थीनींसाठी स्वच्छतागृहांचे बांधकाम करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी बस निवारे बांधण्यात येणार आहेत. भूजल पातळी वाढविण्यासाठी पाईप मोऱ्यांच्या ठिकाणी जल पुनर्भरण व्यवस्था उभारण्यात येणार आहे. प्रकल्प राबविताना सामाजिक व पर्यावरण सुरक्षा सांभाळली जाणार आहे.

    या कामांचे झाले भूमिपूजन

    जळगाव जिल्ह्यातील भुसावळ व जामनेर तालुक्यातील विटवा भुसावळ जामनेर जिल्हा सीमेची सुधारणा फत्तेपुर माटोळा खामगाांव रस्ता रामा – ४४ (भाग – फैजपूर ते जामनेर) मध्ये रस्ता सुधारणा करणे ता.यावल.
    प्रशासकीय मान्यता किंमत – ११०.४१ कोटी
    तांत्रिक मान्यता किंमत ८४.१९ कोटी

    जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील पारोळा ते कजगाव रामा ३९ जकमी २३/७०० ते ५९/९०० ची सुधारणा करणे.
    प्रशासकीय मान्यता किंमत – २८९.६० कोटी
    तांत्रिक मान्यता किंमत २२२.४३ कोटी

    कोठारे दिगर, सटाणा, मालेगाव, चाळीसगाव, पाचोरा, शेंदुर्णी, पहूर, वाकडी रस्ता SH-१९ किमी १८३/६०० ते २१९/२०० ता जामनेर, जि.जळगाव, प्रशासकीय मान्यता किंमत २८४.८९ कोटी

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Mumbai : “महिलांचे राज्य! महाराष्ट्रातील १५ महानगरपालिकांमध्ये महिला महापौर

    January 22, 2026

    महापौरपदाची लॉटरी! २९ महापालिकांच्या आरक्षण सोडतीकडे राज्याचे लक्ष

    January 19, 2026

    Mumbai : महापालिका निवडणूक नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आत्मपरीक्षण; गट एकत्र येण्याची शक्यता

    January 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.