फैजपूर : प्रतिनिधी
कुंभमेळा महापर्व हरिद्वार २०२१ ला सुरुवात झाली असून या कुंभमेळ्यात अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष व फैजपूर येथील सतपंथ संस्थांचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज रवाना झाले असून ते ३० एप्रिल रोजी फैजपूर येथे परत येणार आहे. हरिद्वार या ठिकाणी शाहीस्नान, महामंडलेश्वर पट्टाभिषेक, गोपीगीत कार्यक्रमाचे आयोजन केले
आहे.
स्वामी जगन्नाथ धाम भिमगोडा हरिद्वार याठिकाणी कुंभमेळा महापर्व हरिद्वार २०२१ ला दि.९ एप्रिल पासून सुरुवात होत असून १० एप्रिल रोजी धर्म ध्वजारोहन व जगद्गुरु संतपंथाचार्य ज्ञानेश्वरदास महाराज यांचे सर्व १३ अखाडाद्वारा रात्री १० ते १२ स्वागत समारोह, दि.१२ व १४ एप्रिल रोजी शाहीस्नान, दि.२० ते २६ एप्रिल पर्यंत दुपारी १ ते ४ या वेळेत श्रीमद भागवत ग्रंथातून गोपी गीत कथेचे वैदीक सनातन संतपंथ प्रेरणा पीठ, पीराणा यांनी आयोजन केले आहे. या कथेचे निरूपण महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांच्या अमृतवाणीतून होणार आहे. दि.२६ एप्रिल रोजी महंत जयरामदास महाराज निष्कलंकी धाम नखत्राना कच्छ व आचार्य दिव्यानंदजी महाराज, अर्थवेदिय संतपंथ सेवा आश्रम गादीया, कच्छ यांचा महामंडलेश्वर पट्टाभिषेक समारोह दि.२८ एप्रिल शाही स्नान या सर्व कार्यक्रमाचे आयोजन वैदिक सनातन संतपंथ तीर्थधाम प्रेरणापीठ पिराना, समस्त ट्रस्टी व अखिल भारतीय संतपंथ परिवार, स्वामी जगन्नाथधाम हरिद्वार ट्रस्टी सेवक महंत अरुणदास महाराज, श्रीकृष्ण हरिधाम ट्रस्ट हरिद्वार महंत प्रेमानंद यांनी आयोजन केले आहे.
या सर्व कार्यक्रमाचे लाईव्ह प्रसारण ‘दिशा टी.व्ही.’ चॅनल वर प्रसारीत होणार आहे. प्रशासनाच्या नियमांचे पालन करून भाविक भक्तगण हरिद्वार कुंभमेळा महापर्वमध्ये येऊ शकतात, असे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी कळविले.