यावल, प्रतिनिधी । दर महिन्याला स्वस्त धान्य माल पुरवठा करण्यासाठी शासनाने आता ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी असे वेगवेगळे दोन स्वतंत्र वाहतुकीचे ठेके दिल्याने स्वस्त धान्य दुकानदार आणि स्वस्त धान्य लाभार्थी ग्राहकामध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
स्वस्त धान्य वाहतुकीचा दिलेला ठेका हा ग्रामीण भाग आणि शहरी भागासाठी स्वतंत्रपणे वेगवेगळ्या असला तरी वाहनातून आलेले धान्य हे यावल येथील शासकीय गोडाउन मध्ये उतरवून नंतर पुन्हा तेथून स्वस्त धान्य दुकानदार यांना न्यावे लागणार आहे का?आणि असे असेल तर स्वस्त धान्य दुकानदारास हमाली व वाहतूक खर्चाचा भुर्दंड दुपटीने द्यावा लागणार तसेच इतर अनेक मुद्दे उपस्थित होणार असल्याने याबाबत यावल तहसीलदार आणि पुरवठा अधिकारी यांनी रेशन दुकानदार यांना वेळेवर आणि कमी खर्चात स्वस्त धान्य माल ठेकेदारामार्फत कसा पुरविला जाईल याबाबत कार्यवाही करावी असे रेशन दुकानदारांना मध्ये बोलले जात आहे.
ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी स्वस्त धान्य जळगाव येथून यावल तालुक्यात पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र दोन वेगवेगळ्या ठेकेदारांना ठेका का देण्यात आला याबाबत स्वस्त धान्य दुकानदारांसह स्वस्त धान्य लाभार्थी ग्राहकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.