जळगाव : प्रतिनिधी
येथील सोयो सिस्टिम्स प्रा.लि.चे संचालक किशोर ढाके यांचे वडील भालोद येथील न्यू इंग्लिश स्कूलचे सेवा निवृत्त शिक्षक डालू कृष्णा ढाके (वय ८३) यांचे आज रोजी दुपारी १ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात १ मुलगा, सुन, ३ मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्यावर उद्या जळगाव येथील नेरीनाका स्मशानभूमीत अंतिमसंस्कार होणार असून त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरुन दि. १३ रोजी १० गजानन हाऊसिंग सोसायटी, चर्च जवळ, येथून सकाळी ९ वाजता निघेल.