सेवानिवृत्त कर्मचारी सातवा वेतन आयोग दुस-या हप्त्यापासून वंचित

0
9
भुसावळात आढळला एक नवीन रुग्ण; संख्या चारवरून पाचवर

यावल, प्रतिनिधी । माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील प्राचार्य मुख्याध्यापक सर्व अनुदानित माध्य व उच्च माध्य शाळांना लेखी सूचना देऊन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा दुस-या हप्त्या देण्याची कार्यवाही करावी असे कळविले आहे परंतु प्रत्यक्षात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दुसरा हत्ता मिळत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने जिल्हयामधील सर्व खाजगी अनूदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील सेवानिवृत्त कर्मच-यांना सातवा वेतन आयोग दुस-या हफ्त्याची देयके दिलेल्या तारखाना सादर करावी.ज्या शाळेतील कर्मचारी यांची भ.नि.नि.जमा करावयाची पहिल्या हफ्त्याची देयके तरतूद आभावी कार्यालयाकडे प्रलंबित असतील ती सर्व देयके कार्यालयातून परत घेऊन त्यातील सेवानिवृत्त कर्मच-यांची पहिल्या ह्फ्त्याची देयके रोखीने सादर करावी.तालुका देयके सादर करवयाचा मुक्ताईनगर, धरणगाव, बोदवड, चाळीसगांव यावल, भडगाव, भुसावळ, जामनेर एरंडोल, अमळनेर, रावेर, पाचोरा, चोपडा सेवानिवृत्त कर्मच-यांची सातवा वेतन आयोग दुस-या हफ्त्याची देयके वेळेत सादर न केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत प्राचार्य/मुख्याध्यापक यांची राहील याची नोंद घ्यावी. असे सुद्धा दिलेल्या सूचनेमध्ये म्हटले आहे. मग जळगाव जिल्ह्यात स्थानिक मुख्याध्यापक,प्राध्यापक हे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता का अदा करीत नाहीत याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असल्याने माध्यमिक शिक्षण अधिकारी यांनी तातडीने लक्ष केंद्रित करून कार्यवाही करावी असे जळगाव जिल्ह्यात बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here