यावल, प्रतिनिधी । आज शुक्रवार दि.11रोजी सातपुडा जंगलात यावल येथील डॉ.कुंदन फेगडे यांच्या तर्फे आयोजित मोफत ई श्रमकार्ड नोंदणी महाअभियानास 287 आदिवासी बांधवांनकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.
यावल येथील युवा सामाजिक कार्यकर्त डॉ.कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेले मोफत ई-श्रम कार्ड वितरण अभियान सातव्या टप्प्यात सातपुडा डोंगरात अति दुर्गम आदिवासी भागात पोहोचले या उपक्रमाला आदिवासी बांधवांकडून मोठ्या उत्साहात बहुसंख्येने प्रतिसाद मिळाला.
यावल तालुक्यातील आदीवासी ग्रामीण क्षेत्रातील नागरीकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा तात्काळ लाभ मिळावा या सामाजिक सेवेच्या शुद्ध हेतूने श्रमजिवी कुटुंबास अत्यावश्यक असणारे ई-श्रम कार्डची मोफत नोंदणीचे अभियानास सातवे सत्राला सुरुवात करण्यात आली या अभियानात अतिदुर्गम भागातील,वागझिरा,जामन्या, गाडऱ्या,उसमळी,आबापाणी, लंगडा आंबा,हेलपाणी या सारखे आदिवसी पाडे व गावांचा यात समावेश होता सदर अभियान पाण्याच्या टाकी जवळ वाघझिरा येथे घेण्यात आले.व या अभियानास एकूण 287 लाभार्थ्यांनी या अभियानाचा लाभ घेतला.यावेळी मोफत ई -श्रम कार्ड अभियानाचे उद्घाटन डॉ.कुंदन फेगडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी सिकंदर तडवी(माजी सरपंच)कुरशाद तडवी,इडा बारेला,बिस्मिल्लाह तडवी,संजय तडवी,मर्जीत तडवी सर,सुंदरशिंग बारेला,सुभाष बारेला,हुशान तडवी,अल्लाउद्दीन तडवी,नदीम तडवी,शकील तडवी,संजय बारेला,याकूब तडवी,भारशिंग बारेला,असिफ तडवी,सलीम तडवी,लकड्या बारेला,नामशिंग बारेला,इब्राहिम तडवी,नर्सिंग बारेला,राजू तडवी,मेहरबान तडवी,सुमारिया बारेला,हमीत तडवी,सिकंदर तडवी,फकिरा तडवी,अकबर तडवी,मदनसिंग बारेला,रमजान तडवी,आशिक तडवी,इस्माईल तडवी,आदींची उपस्थिती होती.
सदरील अभियानास सागर लोहार,विशाल बारी,सुरेश बारेला,मोरे,दिपक नेवे,अक्षय राजपूत,नितीन पाटील,आसिफ तडवी यांचे सहकार्य लाभले.