शुभम भोलाणे एमबीबीएस उत्तीर्ण

0
30

जळगाव ः जिल्हा प्रतिनिधी
धरणगाव येथील ऍड.वसंतराव भोलाणे व माजी नगरसेविका चंद्रकलाताई भोलाणे यांचे सुपुत्र डॉ.शुभम भोलाणे आज अंतिम वर्षाची एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण झाला.शुभम हा कॉलेजचा जनरल सेक्रेटरी तसेच महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचा कौन्सिल मेंबर, विद्यार्थी परिषदेची मेडिव्हिजन प्रदेश संयोजक असून त्याचा सेवांकुरच्या माध्यमातून घेतलेल्या अनेक आरोग्य शिबिरात (चित्रकूट, कन्याकुमारी, झारखंड) त्याचा सहभाग होता. तो सध्या प्रदेश कार्यकारणी सदस्य म्हणून काम करीत आहे.अनेक सामाजिक जबाबदारी त्याने यशस्वीपणे पेलल्या आहेत.डॉ.शुभम भोलाणेे हे डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज,जळगावचा विद्यार्थी होता.या निमित्ताने सर्वच स्तरातून त्याचे कौतुक होत आहे डॉ. शुभम भोलाणे यांचे ‘साईमत.’चे संपादक प्रमोद बर्‍हाटे, व्यवस्थापक सुनिल अहिरे, भारतीय पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष (शहरी) हेमंत काळुंखे यांच्यासह समाजातील प्रतिष्ठीतांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here