वडिलांनी स्वप्नात दिली खजिन्याची माहिती, मुलाला सापडली 4 कोटींची चोरी

0
73

मुंबई : प्रतिनिधी 

स्वप्न  ही प्रत्येकालाच पडतात. त्या स्वप्नांचे अर्थ लावण्याचे प्रकार आपण सारे जण करतो. स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टींचा प्रत्यक्ष आयुष्याशी संबंध जोडणारे अनेक सिनेमे, गोष्टी आहेत. प्रत्यक्ष आयुष्यात स्वप्नातील गोष्टी खऱ्या होण्याचे प्रकार कमीच घडतात. मुंबईतील लालबागच्या व्यापाऱ्याचं स्वप्न मात्र खरं ठरलं आहे. या व्यापाऱ्याच्या स्वप्नात त्याचे दिवंगत वडील आले होते. त्यांनी त्याला कोट्यवधींच्या खजिन्याची माहिती दिली. वडिलांनी स्वप्नात दिलेल्या माहितीनुसार त्या मुलाने खजिन्याचा शोध घेतला आणि तब्बल 4 कोटींच्या चोरीचा उलगडा झाला आहे.
एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार लालबागाचे व्यापारी दीपक जैन यांच्या कुटुंबीयांनी गिरगावच्या विठ्ठलवाडी परिसरात एक रूम भाड्यानं घेतली होती. जैन यांच्या वडिलांच्या निधनानंतर ही रूम बंद होती. जैन यांना स्वप्नात त्यांच्या वडिलांनी गिरगावच्या घरात खजिना असल्याची माहिती दिली. जैन यांनी त्यानंतर थेट गिरगाव गाठले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here