रेशन कार्ड धारकांचे हक्क आणि अधिकार खड्ड्यात, दुकान तपासणी फक्त कागदावर

0
5
भुसावळात आढळला एक नवीन रुग्ण; संख्या चारवरून पाचवर

यावल, प्रतिनिधी । राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013अंतर्गत रेशन कार्ड धारकांसाठी शासनाने विविध अटी व शर्ती घालून दिलेल्या आहेत परंतु यावल रावेर तालुक्यासह संपूर्ण भुसावळ विभागात आणि जिल्ह्यात रेशन कार्ड धारकाचे हक्क आणि अधिकार कोणी आणि कशासाठी कोणत्या हेतूने खड्ड्यात टाकले याकडे तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने रेशनकार्डधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे रेशन कार्डधारकांना मध्ये पुरवठा विभागाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

रेशन धान्य दुकान धान्य वाटप/वितरण करण्यासाठी सकाळी चार तास आणि दुपारी चार तास धान्य दुकान सुरू पाहिजे आठवड्यातून एक दिवस सुट्टी असते. प्रत्येक रेशन दुकानांमध्ये दर्शनी भागात रेशन कार्ड धारक यांना माहितीसाठी ठळक अक्षरात फलक लावलेला पाहिजे,त्या फलकावर रेशन दुकानाचा रेशन दुकानदाराचे नाव, रेशन दुकानदाराकडे पिवळ्या व केशरी कार्ड धारकांची संख्या किती आहे ती माहिती त्या फलकावर पाहिजे तसेच सर्व गटासाठी धान्याचे भाव नमूद केलेले पाहिजे उपलब्ध असलेला धान्याचा कोठा,रेशन धान्य दुकान सुट्टीचा दिवस,रेशन दुकान चालू व बंद होण्याची वेळ, रेशन दुकानदाराची जेवणाची वेळ,रेशन कार्यालयाचा पत्ता व फोन नंबर,तालुका पुरवठा अधिकारी व शिधावाटप अधिकारी कार्यालयाचा पत्ता व फोन नंबर,दुकानात तक्रार वही उपलब्ध असल्याची सूचना तसेच बीपीएल,अंत्योदय व अन्नपूर्णा लाभार्थ्यांची यादी दुकानात उपलब्ध पाहिजे.

यासोबतच बीपीएल व अंत्योदय रेशन कार्ड धारकांना एखाद्या महिन्यात धान्य न घेता आल्यास पुढच्या महिन्यात त्याला धान्य दिले गेले पाहिजे,बीपीएल व अंत्योदय रेशन कार्ड धारकांना एका महिन्यात चार “हत्या”मध्ये धान्याची उचल करता येऊ शकते, दुकानातील धान्याचे नमूने प्लास्टिकच्या सीलबंद पाकीटात ठेवलेले पाहिजेत,रेशन धान्य पावती मराठीत रेशन कार्ड धारकास दिली गेली पाहिजे,त्या पावतीवर रेशन दुकान नंबर सुद्धा पाहिजे अशा प्रकारे रेशन कार्ड धारक तथा ग्राहक हिताचे अनेक निर्णय शासनाने घेतलेले असले तरी प्रत्यक्षात यातील अनेक नियम काही संबंधित म्हणजे 90 टक्के रेशन दुकानदारांनी खड्ड्यात घातले आहेत रेशन दुकानदारांची तपासणी करताना पुरवठा अधिकारी,तपासणी अधिकारी काय तपासणी करून अहवालात नोंद काय करतात आणि दक्षता समिती सदस्य काय बघतात हे त्यांनाच माहित याची चौकशी सुद्धा जिल्हा पुरवठा अधिकारी आणि जिल्हाधिकारी जळगाव यांनी करायला पाहिजे.

वरिष्ठ अधिकाऱ्याला स्नेह भोजनासह 25 लाखाचा हप्ता
यावल तालुक्यातून दर महिन्याला 15 ते 20 ट्रक रेशन धान्य माल बाजारात रवाना होत असते.रेशन दुकान तपासणीच्या नावाखाली प्रत्येक रेशन दुकानदाराकडून एक हजार ते दोन हजार रुपये फि (रेशन दुकान तपासणीच्या नावाखाली)जमा करून ती एका वरिष्ठ अधिकाऱ्याला देण्यात येते तो वरिष्ठ अधिकारी भुसावळ मार्गे यावल तालुक्यात ग्रामीण भागात एका रेशन दुकानदाराच्या घरी महिन्यातून किमान दोन-तीन वेळा येऊन घरगुती वातावरणात स्नेहभोजनाचा मनसोक्त आनंद घेऊन गोळा केलेल्या रकमेची बॅग सुद्धा घेऊन जातो अशी चर्चा भुसावल तापी नदी बंद पडलेल्या टोलनाक्यापासून पाडळसे, वनोली,कोसगाव परिसरात बोलले जात आहे तसेच यावल तालुक्यातून दर महिन्याला दहा ते पंधरा ट्रक रेशन धान्य माल काळ्याबाजारात नेणारा व्यापारी त्याच वरिष्ठ अधिकाऱ्याला दर महिन्याला वीस ते पंचवीस लाख रुपयांचा हप्ता एक रकमी पोच करीत असल्याची तसेच स्नेहभोजन देणारा व्यक्ती राज्यातील एका मंत्र्याचा जवळचा नातेवाईक असल्याने याबाबत भुसावळ परिसरासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात दबक्या आवाजात चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here