यावल शहरातील स्वामी समर्थ नगरमध्ये 50 हजार रुपयाची चोरी

0
3

यावल, प्रतिनिधी । शहरात स्वामी समर्थ नगर मध्ये एका घराचे लोखंडी व लाकडी दरवाज्याचे कडी,कोंडी तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून रोख 6 हजार, सोन्याची पोत,चांदीचे कडे, चांदीच्या साखळ्या असा एकूण 47 हजार 400 रुपयांचा ऐवज लांबविला यामुळे संपूर्ण स्वामी समर्थ नगर व यावल शहरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत यावल पोलीस स्टेशनला तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला सदरची घटना आज दि.13रात्री घडली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत सेवानिवृत्त कंडक्टर कांतीलाल ठानसिंग पाटील वय 62 यांनी म्हटले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय पठान हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here