यावल, प्रतिनिधी । आज बुधवार दि.९ रोजी यावल तालुक्यातील सांगावी बु.येथे डॉ. कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील केंद्र आणि राज्य शासनाच्या महत्वाकांशी विविध योजनांचा लाभ मिळावा म्हणून भविष्यात आवश्यक असलेले ई-श्रम कार्डची मोफत नोंदणी अभियानाचे साहवे सत्रात हे पोहोचले आहे.
सांगवी बु. ग्रामपंचायत जवळ या मोफत ई – श्रम कार्ड नोंदणीचे सत्र घेण्यात आले,याअभियानात गावातील एकूण385लाभार्थ्यांनी लाभ घेतला.याअभियानाच्या प्रमुख पदी श्रीकांत महाजन होते. अभियानाचे उदघाट्न जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष श्रीकांत दादा महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नारायण चौधरी, योगेश भंगाळे, डॉ. कुंदन फेगडे, रशीद तडवी (सरपंच), धनराज पाटील, दिनेश पाटील, योगेश भंगाळे, शरद तायडे, प्रशांत बेंडाळे, अभय नेमाडे, प्रशांत चौधरी, अतुल चौधरी, राजू तडवी, न्याजउद्दिन तडवी, फिरोज तडवी, कुंदन कोळी, युवराज कोळी, योगेश कुंभार, प्रकाश कोळी, भूषण सूर्यवंशी, सुनील बणाईत, जितेंद्र कोळी, पवन कोळी, रवींद्र कोळी, योगेश धांडे, मिलन पाटील, सचिन कोळी आदींची उपस्थिती होती. सदरील अभियानास धिरज भोळे, सागर लोहार, मनोज बारी, विशाल बारी, दिपक फेगडे, हर्षवर्धन मोरे, जयवंत माळी, चेतन कापुरे, शुभम सोनवणे यांचे सहकार्य लाभले.