सोयगाव : प्रतिनिधी
संभाजीनगर समाज कल्याण सभापती मोनाली राठोड यांनी जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना तीनचाकी स्कुटर मंजूर केल्या होत्या त्यानुसार जिल्ह्यातील ७० दिव्यांग बांधवांना तीनचाकी स्कुटरचे वाटप करण्यात आले.
यावेळी संभाजीनगर शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड यांच्या हस्ते व समाज कल्याण सभापदी मोनालीताई राठोड यांच्या हस्ते जिल्ह्यातील ७० दिव्यांग बांधवांना मंजूर करण्यात आलेल्या ७० तीनचाकी स्कुटरचे वाटप करण्यात आले यावेळी दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते
संभाजी नगर समाज कल्याण सभापती मोनाली राठोड व संभाजी नगर शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांच्या प्रयत्नातून तीनचाकी स्कुटरची मंजुरी मिळाली व स्कुटरचे वाटप देखील झाले. यामुळे समाधानी असलेल्या दिव्यांग बांधवांनी संभाजीनगर शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड व समाज कल्याण सभापती मोनाली राठोड यांचा सत्कार करून आभार मानले