कजगाव : प्रतिनिधी
ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरात कजगावच्या केटीव्ोयरचा भराव वाहुन गेला होता. यामुळे केटी व्ोयरला गळती लागल्याने केटीव्ोयरने तळ गाठला आहे तर दुसरीकडे चमकवाडी भागातील पाझर तलावाला गळती लागल्याने तो कोरडा पडला असून बरड भागातील विहिरीच्या जल पातळ्या तळ गाठण्यास सुरुवात झाली आहे. या महत्वपूर्ण बाबीकडे संबधित खात्याने तात्काळ लक्ष देऊन कजगाव केटी व्ोयर भरावचे व पाझर तलावच्या दुरुस्तीचे काम सुरू कराव्ो अशी मागणी होत आहे.
यासाठी आमदार किशोर पाटील यांनी शासन दरबारी ठोस पाठपुरावा करून वरील कामा साठी तात्काळ निधी उपलब्ध करावा अशी मागणी होत आहे
ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरात कजगाव च्या केटी व्ोयर चे दोघ बाजुचा भराव वहाता झाल्याने या केटी व्ोयर मधुन पाण्याची मोठया प्रमाणात विसर्ग सुरू होता या मुळे या केटी व्ोयर ने तळ गाठला आहे सदर केटी व्ोयर चं भराव वास्तविक तात्काळ होणे गरजेचे होते मात्र या महत्वपूर्ण मागणीकडे साऱ्याच दुर्लक्ष झाल्याने या केटी व्ोयर च्या भराव चे काम अद्यापही म्हणजे गेल्या सहा महिन्यात सुरू न झाल्याने कजगावकराचे हक्काचे पाणी हे वाया गेले आहे सदर च्या केटीव्ोयरची जल पातळी ने तळ गाठला आहे. यामुळे परिसरातील बागाईत विहिरी बोरींग यांच्या जल पातळ्या खोल जाऊ लागल्या आहेत पर्यायी पाणी प्रश्न उभा राहू शकतो केटी व्ोयर ची जल पातळी तळ गाठल्या मुळे पाझर तलाव देखील कोरडा पडला आहे जुनच्या आत केटीव्ोयर दुरुस्ती होणे गरजेचे
ऑगस्टमध्ये वाहुन गेलेल्या कजगावच्या केटी व्ोयर भराव बाबत अद्यापही कोणतीही हालचाल होत नसल्याने शेतकरी बांधवांनी चिंता व्यक्त केली आहे. कारण या केटी व्ोयरचे काम जुन च्या आत सुरू न झाल्यास येत्या पावसाळ्यातील पाणी या केटी व्ोयर मध्ये थांबणार नाही पर्यायी या भागातील बागाईत धोक्यात येईल पाणी प्रश्न देखील बिकट होईल करीता येत्या जुन महिन्याच्या आत या केटी व्ोयर चे काम पुर्ण होणे गरजेचे आहे या साठी सबंधित खाते तसेच आमदार किशोर पाटील यांनी पाठपुरावा करावा अशी मागणी होत आहे.