मलकापुर येथील उपजिल्हा रुग्णालयात समोरील हॉटेलला आग

0
62

मलकापुर, प्रतिनिधी । येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर आगीचे तांडव उपजिल्हा रुग्णालय समोरील एस.एस.राजपाल या किराणा व्यावसायिकाच्या दुकानात माल खाली करून निघालेल्या मालवाहू ट्रक क्रमांक युपी 70 सिटी 8445 च्या वरील बाजूस विद्युत प्रवाहाच्या सर्विस लाईनच्या तारा अडकुन जवळच असलेल्या डीपीवर शॉर्टसर्किट झाला बाजूला असणाऱ्या जाधव यांच्या चहा नाश्त्याच्या हॉटेल वर विद्युत तारा पडल्याने त्या हॉटेलला आग लागून त्यातील 50 ते 60 हजार रुपयांचे सामान जळून खाक झाले आहे.

ही घटना रविवार दि. 14 रोजी रात्री आठच्या सुमारास घडली उपजिल्हा रुग्णालय समोर राजपाल किराणा दुकानावर रोजच दिवसभर मोठ मोठी जड मालवाहू वाहने उभी असतात यामुळे येथे रहदारीचा खोळंबा होत असतो माणसाला साधे पायी चालण्यास सुध्दा जागा नसते तसेच बऱ्याच वेळेस रुग्णवाहिकांनाही अडथळा होऊन त्यांना ताटकळत उभे राहावे लागते बरेचदा या विरुद्ध तक्रारी करण्यात आल्या परंतु धनदांडगे असणाऱ्या व्यावसायिकावर तक्रारींचा कुठलाही फरक पडल्याचे दिसून येत नाही. यामध्ये महावितरण चे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले महावितरणच्या व मोठा अनर्थ टळला आहे. यावरून शहर पोलीस स्टेशन यांनी एन सी 21 कलम 427 भारतीय दंड विधान नुसार ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here