बिबट मृत्यू प्रकरणी आरोपीचा जामीन नामंजूर आरोपीची हर्सूल जेलला रवानगी

0
2

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी

सोयगाव वनपरिक्षेत्रातील मौजे जरंडी याठिकाणी आढळलेल्या वन्यप्राणी बिबट मृत्यूप्रकरणी वनविभागाने दिनांक 27/02/2022 रोजी अटक केलेल्या आरोपीस मा. न्यायालय सोयगाव याठिकाणी हजर करण्यात आले. सदर प्रकरणी मा. न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर केला असून आरोपीची हर्सूल जेलला रवानगी करण्यात आली आहे. सदर प्रकरण वनविभागाने युद्धपातळीवर घेतले असून लवकरच याचे सूत्रधार गजाआड होतील अशा तीव्र हालचाली सुरू आहेत. त्यामुळे अवैध शिकार करणाऱ्याना चांगलीच चपराक बसली आहे.

मादी बिबट्याचा जीव वाचविण्यासाठी वनविभागाने केली जिवतोड मेहनत
दिनांक 24/02/2022 रोजी मरणासन्न अवस्थेत आढळलेल्या बिबट्यास वनविभागाने तातडीने सोयगाव येथे हलवून तीन डॉक्टरांना पाचारण केले. औषधे, ऑक्सिजन सिलेंडर, तातडीने हलविण्यासाठी मोबाईल व्हॅन, आवश्यक संसाधने इ. त्वरित उपलब्ध करून दिले. औरंगाबाद व गुजरात येथील तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली जीवाचे रान करून सदरील बिबट्याचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यास यश आले नाही व अखेर बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे वनविभाग व डॉक्टरांनी अतिशय हळहळ व्यक्त केली. त्याचाच वचपा आज वनविभागाने काढला.

दोन बिबट्याच्या मृत्यूचे घाव वनाधिकाऱ्यांच्या काळजावर कोरल्या गेल्यामुळे वनविभागाने वेगवान चक्रे फिरवून 48 तासातच आरोपींचा शोध लावून त्यापैकी एकास अटक करून ताब्यात घेतले व इतर फरार आहे लवकरच त्याच्यासुद्धा मुसक्या आवळण्यात येणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे. सदर प्रकरणी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 चे कलम 9 अन्वये वनगुन्हा दाखल करण्यात आलेला असून कलम 51(1) अन्वये भंग करणाऱ्यास 3 ते 7 वर्षाची शिक्षा व 10000 दंडाची तरतूद आहे. त्यामुळे अवैध शिकार, शिकार करण्याचा प्रयत्न, शिकारीस मदत किंवा अपप्रेरणा देणे असे बेकायदेशीर कृत्य कोणीही करू नये असे वनविभागाकडून आवाहन करण्यात आले आहे..

खवले मांजर व रानडुक्कर अवैध शिकार प्रकरणातही वनविभागाची दमदार कामगिरी
ऑगस्ट महिन्यात अतिशय दुर्मिळ खवले मांजर व रानडुक्कर प्रकरणी वनविभागानेअनुक्रमे 4 व 7 आरोपींना अटक केली होती सदर प्रकरणी सुद्धा मा. न्यायालयाने आरोपीचा जामीन नामंजूर करून हर्सूल जेलला रवानगी केली होती ही बाब विशेष. वनविभागाने वन व वन्यजीव संरक्षणात सातत्याने केलेल्या धडक कारवायांमुळे जवळपास सर्वच प्रकारच्या अवैध कृत्य करणाऱ्याचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

सदर प्रकरणी मा. सूर्यकांत मंकावार, उपवनसंरक्षक औरंगाबाद व श्रीमती पी.पी. पवार सहायक वन संरक्षक सिल्लोड यांच्या मार्गदर्शनाखाली
वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ पुढील तपास करीत आहे. यावेळी उपचार व तपासकामी डॉ. व्ही. व्ही. चव्हाण पशुधन विकास अधिकारी सोयगाव, डॉ. शाम चव्हाण पशुधन विकास अधिकारी सिल्लोड, डॉ. रोहित धुमाळ विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा औरंगाबाद, श्री वाय. व्ही. पाटील पशुधन पर्वेक्षक, श्री ए. के. दाभाडे पशुधन पर्यंर्वेक्षक वनपाल ए.टी.पाटील, जी एन सपकाळ, एन डी काळे, वनरक्षक नितेश मुलताने, जी.टी नागरगोजे, एस.हिरेकर, एस. टी चेके, सुदाम राठोड, एम शिंदे, एन. सोनवणे, वाय. बोखारे, एस.डी.कुच्चे, एस.तडवी, ए, सिद्दीकी,आदी गुडे सर, श्रीकांत वाहुळे, समाधान मोरे, गोविंदा गांगुर्डे, सी. झाल्टे, एस.जाधव, यांनी भरीव कामगिरी केली..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here