प.वि.पाटील विद्यालयाचे विद्यार्थी भागवत आहे पक्ष्यांची तहान-भूक

0
6

जळगाव ः प्रतिनिधी
सगळीकडे कोरोना विषाणूची महामारी असताना त्यातच उन्हाळ्याचे दिवस अशा परिस्थितीत पक्ष्यांना आपल्या जाण्यासाठी व पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यांना आपल्या पोट भरण्याची सोय मिळावी व त्यांचे रणरणत्या उन्हात बसून संरक्षण व्हावे या उद्दिष्टाने उपशिक्षक सूर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष्यांसाठी मूठभर दाणा व घोटभर पाणी हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांनी आपल्या घराच्या सोयीस्कर ठिकाणी पक्ष्यांसाठी दाण्याची व पाण्याची व्यवस्था केलेली आहे टाकाऊ वस्तूंपासून विद्यार्थ्यांनी सुंदर सुंदर पाण्याच्या परळ तयार केलेल्या असून त्यात ते पक्ष्यांना दाणा आणि पाणी पुरवत आहे.
उपक्रमात वरून लोखंडे , रेणुका परदेशी , रितिषा सोनवणे , कार्तिकी कोल्हे,श्रेयस पाटील,पलक तडवी, चिन्तनिका पाटील या विद्यार्थ्यांनी सर्वोत्कृष्ट अशा पडवळ तयार करून सावलीच्या ठिकाणी देऊन पक्षांना नियमितपणे पाणी व दाणे पुरवत आहेत
उपक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यात सहभागी होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here