पुष्पक एक्सप्रेस दरोडा व बलात्कारप्रकरणी आठही संशयित आरोपींना अटक

0
9
पुष्पक एक्सप्रेस दरोडा व बलात्कारप्रकरणी आठही संशयित आरोपींना अटक

ठाणे, वृत्तसंस्था । पुष्पक एक्सप्रेसमध्ये दरोडा टाकून महिलेवरील बलात्कार प्रकरणी कल्याण जीआरपी पोलिसांनी आठ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आठ पैकी दोन दरोडेखोरांनी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. हा दरोडा सुनियोजित नसला तरी आरोपी हे सराईत गुन्हेगार मानसिकतेचे असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

नेमकं प्रकरण काय?

8 ऑक्टोबरच्या रात्री साडेसात वाजता लखनऊ सीएसटी पुष्पक एक्सप्रेसमध्ये डी टू या बोगीत दरोडा टाकण्यात आला. आठ दरोडेखोरांनी 16 प्रवाशांना मारहाण करुन त्यांच्याकडील मोबाईल रोकड लूटली होती. मारहाणीत सहा प्रवासी जखमी झाले होते. नऊ प्रवाशांचे मोबाईल आणि सहा प्रवाशांची रोकड आणि एका महिलेवर दोन आरोपींनी लैगिंक अत्याचार केला होता.

पोलिसांनी तपास कसा केला?

कसारा रेल्वे स्टेशनच्या आधी आरोपींपैकी एकाने गाडीची साखळी खेचली. यावेळी तीन आरोपी पळून गेले. उर्वरीत पाच पैकी तीन कसारा स्टेशऩ आल्यावर उतरले. उर्वरीत दोन आरोपींना प्रवाशांनी पकडून ठेवले. कल्याण जीआरपी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. या दोन आारोपींकडून पोलिसांनी माहिती घेतली आणि तपास सुरु केला.

मध्य रेल्वेचे पोलीस आयुक्त कैसर खालीद, उपायुक्त मनोज पाटील, वरिष्ठ पोलिस निरिक्षक वाल्मीक शादरूल, पोलीस निरीक्षक पांढरी कांदे मध्ये पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलिसांचे तीन पथके आणि कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी तपास सुरु केला. या गुन्ह्यातील आरोपी अरशद शेख, प्रकाश पारधी, अर्जुन परदेशी, किशोर सोनवणे, काशीनाथ तेलंग, आकाश शेनोरे, धनंजय भगत आणि राहूल आडोळे या आठही आरोपींनी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

आठ पैकी सात आरोपी हे नाशिक येथील घोटी टाके येथील आहेत. एक आरोपी मुंबईचा आहे. आकाश शेनोरे या सर्वांचा म्होरक्या आहे. सर्व आरोपींनी घोटी येथे मद्यपान केले. नंतर इगतपूरी रेल्वे स्टेशन येथे मद्यपान केले. तसेच गांजा ओढला होता. ते इगतपूरी येथे पुष्पक एक्सप्रेसमध्ये चढले. त्यांनी दरोड्याचे काही प्लॅनिंग केले नव्हते. पण सर्व आरेोपी हे गुन्हेगारी मानसिकतेचे आणि सराईत असल्याची माहिती समोर आली आहे.

चार आरोपींना शनिवारी कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना 16 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर एका आरोपीला आज हजर केले असता त्याला सुद्धा 16 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आज अटक करण्यात आलेले तीन आरोपींना उद्या पोलीस कोर्टात हजर करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here