जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर पेठ येथील केंद्रीय जिल्हा परिषद मुलांची शाळेत नवीन शालेय व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली.
आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास शाळेतील पाल्यांची व ग्रामस्थांची बैठक शाळेतील हॉलमध्ये घेण्यात आली या बैठकीत शालेय व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली यामध्ये अध्यक्ष भैया मोरे उपाध्यक्ष अफसर तडवी शिक्षक तज्ञ म्हणून शिवसेना प्रमुख तथा पत्रकार गणेश पांढरे सुरेखा बाई मोरे निर्मलाबाई कलाल मनोज मोरे संजय जवखेडे संगीता लोहार अंजना पांचाळ अलीम तडवी हिना पिंजारी मंगला सावळे शिक्षक प्रतिनिधी म्हणून उपशिक्षक मिलिंद तायडे सचिव मुख्याध्यापक रवींद्र खोडपे आदींची एकमताने निवड करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे धनगर समाज उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील उपसरपंच शाम भाऊ सावळे ग्रामपंचायत सदस्य शरद पांढरे ग्रामपंचायत सदस्य तथा माजी उपसरपंच रवींद्र मोरे यांच्यासह पालक व ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्व सदस्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षक गणेश राऊत यांनी केले तर आभार मुख्याध्यापक रवींद्र खोडपे यांनी मानले