धानोरा ता. चोपडा, प्रतिनिधी । येथुन जवळच असलेल्या अडावद ता.चोपडा – यंदाच्या नवरात्रोत्सवात आगमन आणि विसर्जन मिरवणूकीसह दांडीया गर्भा खेळण्यावर शासनाच्या मार्गदर्शक सुचना नुसार पुर्णपणे बंदी असणार आहे त्या ऐवजी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिरे ,बेटी बचाव बेटी पढाई,स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन वर्ग आदी समाजाभिमुख उपक्रम राबवून शारदोत्सव साजरा करून सामाजिक सलोखा जोपासण्याचे अवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण दांडगे यांनी केले.
अडावद येथील पोलिस वसाहती मधील सार्वजनिक गुरूदत्त मंदिराच्या सभागृहात आज दि.६ रोजी सायंकाळी ५ वाजता आगामी नवरात्रोत्सव आणि ईद ए मिलाद सण उत्सवा बाबत शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच सौ.भावनाताई माळी, पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील,तंटामुक्त समिती प्रमुख साखरलाल महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत आगामी सण उत्सवा बाबत कायदा व सुरक्षा अबाधित ठेवून उत्सव साजरे करण्याबाबत सांगोपांग चर्चा झाली.बैठकीस पी.आर.माळी,वजाहतअली काझी,शकील शेख, शांताराम पवार,हनुमंतराव महाजन,प्रभाकर महाजन,मनोहर देशमुख ,माजी सभापती ताहेर मन्यार,सुरेश बाहेती,जहांगीर पठाण,जितेंद्र परदेशी,लक्ष्मण पाटील,हाजी रज्जाक मन्यार,भुषण पंचोली,कैलास