धुळे, प्रतिनिधी । माजी मंत्री कमलाबाई अजमेरा यांचे नातू व पश्चिम खान्देश सेवा मंडळाचे अध्यक्ष अतुल अजमेरा (वय ५३) यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
त्यांचा पार्थिवदेह गुरुवारी सकाळी नऊ ते साडेदहा या वेळेत देवपुरातील पश्चिम खान्देश सेवा मंडळाच्या महिला कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. अतुल यांची गेल्या आठवड्यात स्टेट यूथ हाॅस्टेलच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. ते आदिवासी व गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्नशील हाेते. अतुल यांचा पार्थिवदेह सकाळी ११ वाजता भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. ते धुळे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आशिष अजमेरा यांचे बंधू होत.