बोदवड :- शहरातील भगतसिंग सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयास मुख्याधिकारी आकाश डोईफोडे यांनीबारा हजार रुपयांची स्पर्धा परीक्षेस उपयुक्त ठरतील अशी अभ्यास पुस्तके भेट दिली.शिवजयंती निमित्ताने संपन्न झालेल्या या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष
आनंदा पाटील तर प्रमुख पाहुणे तहसिलदार योगेश्वर टोम्पे हे होते.
शिवजयंतीचे औचित्य साधून बोदवड नगरपंचायतचे मुख्याधिकारी डोईफोडे यांनी ही भेट दिली.विद्यार्थ्यांनी वाचन वाढवणे गरजेचे आहे त्यामुळे त्याचे व्यक्तीमत्वाची जडणघण होते त्यासाठीच हि छोटीशी थेट आपण ग्रंथालयास दिली असे मनोगत डोईफोडे व्यक्त केले.तहसिलदार टोम्पे यांनी सुद्धा आपल्या मनोगतात वाचन वाढवण्याची गरज असल्याचे सांगत वाचनाने होणारे कायदे यावर भाष्य केकेले जेष्ठ ष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील यांनी भगतसिंग वाचनालय व ग्रंथालय समिती वाचन चळवळ जोपासण्यास करत असलेल्या प्रयत्नास दाद देऊन उपयुक्त पुस्तके दिल्या बद्दल डोईफोडे यांचे अभिनंदन केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते
पुरुषोत्तम पाटील, विनोद पाडर , नगरसेवक भरत पाटील यांनी समयोचित मनोगते व्यक्त केली. या वेळी प्रमुख उपस्थिती संजू गायकवाड राष्ट्रवादी पक्ष गट नेते जफर शेख, नगरसेवक मुजम्मील शाह,नगरसेविका योगिता खेवलकर, पूजा जैन, तसेच संदीप पारधी,अमृत पटेल मधुकर खंबायत, नगरपंचायत कार्यालय अधीक्षक राजुसिंग चव्हाण, आरोग्य विभागचे मनोज छपरीबंद हे होते यावेळी नगराध्यक्ष आनंदा पाटील यांनी दहा हजार रुपयांची देणगी वाचनालयास देण्याचे आश्वासन दिले.राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक यांनी सुद्धा त्यांचे मार्फत पुस्तके भेट देण्याचा निर्णय जाहीर केला कार्यक्रमासाठी वाचनालयाचे अध्यक्ष नाना पाटील समिती सदस्य प्रवीण जैन,गोविंद गांधी, दिलीप वाघ, इब्राहिम पाटा,रोहित बडगुजर, विजय चौधरी,दिलीप तेली,संतोष बडगुजर यांनी नियोजन केले सूत्रसंचालन अतुल पाटील तर आभार प्रदर्शन डॉ. दिलीप तेली यांनी मानले